---Advertisement---

वुई आर द चेन्नई बॉईस! जडेजा-ब्रावोने गाणं गात साजरा केला चेन्नईचा विजय

On: रविवार, ऑक्टोबर 17, 2021 4:38 PM
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दुबई येथे झालेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या अंतिम सामन्यात सीएसकेने केकेआरचा २७ धावांनी पराभव करत आयपीएलचे जेतेपद पटकावले. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचे हे चौथे आयपीएल जेतेपद आहे. जेतेपद जिंकल्यानंतर चेन्नई संघाच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. त्यातल्या त्यात ड्वेन ब्राव्हो आणि रवींद्र जडेजा यांनी आपल्या शैलीत जेतेपद पटकावल्याचा आनंद साजरा केला.

गेला महिनाभर सर्व खेळाडू बायो बबलमध्ये होते. त्याआधी आयपीएल स्पर्धा महामारीच्या प्रादुर्भावामुळेमधेच थांबवण्यात आली होती. या सर्व दिव्यातून जात चेन्नई संघासाठी हा विजय खास ठरला होता. विजयानंतर ड्वेन ब्राव्हो आणि रवींद्र जडेजा यांनी ज्याप्रकारे आपल्या संघाचा विजय साजरा केला त्याने प्रत्येकाची मने जिंकली.

सामन्यानंतर झालेल्या गप्पा सत्रात ते दोघे सीएसकेचे ‘वुई आर द चेन्नई बॉईस’ हे थीम साँग गाताना दिसले. या दोघांची ही व्हिडिओ क्लिप आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आली आहे.

अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सने २० षटकांत ३ बाद १९२ धावा केल्या. यामध्ये सलामीवीर फाफ डू प्लेसिसने ८६ धावांची शानदार खेळी केली आणि संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. याशिवाय ऋतुराज (३२), रॉबिन उथप्पा (३१) आणि मोईन अली (३७) यांनीही महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना, केकेआरचे सलामीवीर शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यर यांनी पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली आणि संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. पण पहिला गडी बाद झाल्यानंतर सीएसकेने केकेआरला पुन्हा सावरण्याची संधी दिलीच नाही. केकेआरचे खेळाडू गडी बाद होण्याच्या दबावाखाली आले आणि ते निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १६५ धावाच करू शकले. यासह, सीएसके संघाने सामना जिंकला आणि आयपीएल चषकही आपल्या नावे केला.

महत्त्वाच्या बातम्या – 

सीएसकेला ४ ट्रॉफी जिंकवणाऱ्या ‘थाला’ला आयपीएल २०२२मध्ये रिटेन करणार? सीएसकेकडून आले उत्तर

ब्रेकिंग! शास्त्री अन् सपोर्ट स्टाफची गच्छंती निश्चित, बीसीसीआयने वरिष्ठ संघाच्या प्रशिक्षकपदांसाठी मागवले अर्ज

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने भारत सुरू करणार टी२० विश्वचषकाचा महारणसंग्राम, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---