---Advertisement---

ब्राझील कोलकातामधील फुटबॉल प्रेमाने थक्क! ऐतिहासिक सामन्याच्या आयोजनाचे प्लानिंग सुरू

On: शनिवार, जुलै 25, 2026 12:17 PM
---Advertisement---

ब्राझीलचा पुरुष राष्ट्रीय संघ एका आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यासाठी भारतात येण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात हा होऊ शकतो. या सामन्यासाठी यजमान शहर म्हणून कोलकाताचे नाव समोर आले आहे.

ईएसपीएनच्या माहितीनुसार, पाच वेळेच्या विश्वविजेत्या संघाला उपखंडात आणण्यासाठी ब्राझिलियन फुटबॉल महासंघ (CBF) भारतीय आयोजकांशी चर्चा करत आहे. या सामन्याची चर्चा फिफा विश्वचषक 2026 दरम्यान सुरू झाली. स्पर्धेदरम्यान ब्राझीलला आणि इतर संघांना भारतीय चाहत्यांकडून मिळालेला प्रचंड पाठिंबा, हे हा सामना आयोजन करण्यामागचे कारण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ब्राझील सप्टेंबरच्या अखेरीस ते ऑक्टोबरमध्ये तीन मैत्रीपूर्ण सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन सामने खेळण्याची आधीच निश्चित झाले आहे. हे सामना 25 सप्टेंबर रोजी टाउन्सविले आणि 29 सप्टेंबर रोजी ब्रिस्बेनमध्ये खेळले जाणार आहेत. आता तिसऱ्या सामन्याची चर्चा असून तो भारतात आयोजित केला जाण्याची दाट शक्यता आहे.

या सामन्यात ब्राझीलचा प्रतिस्पर्धा कोण हे अद्याप निश्चित झालेले नाही, मात्र बांगलादेश, सिंगापूर किंवा कतार यांनी यजमानपद भुषवण्याच्या मागणीला जोर धरला आहे. सध्यातरी भारताचे नाव यामध्ये वर आहे.

फुटबॉलवेडे कोलकाता
भारताने फिफा विश्वचषक स्पर्धेला पात्रता मिळवली नसली, तरी अनेकांनी स्पर्धेदरम्यान ब्राझील आणि अर्जेंटिनासारख्या संघाला आपला पाठिंबा दर्शवत प्रेम, आपुलकी दाखवली आहे. कोलकाताला मोहन बागान, ईस्ट बंगाल आणि मोहम्मदन स्पोर्टिंग यांसारख्या प्रतिष्ठित क्लब्सच्या माध्यमातून फुटबॉलचा वारसा शतकाहून अधिक जुना आहे.

ब्राझील आणि कोलकाताचे फुटबॉल नाते तसे काही नवे नाही. ब्राझीलचे दिग्गज पेले यांनी 1977 मध्ये न्यूयॉर्क कॉसमॉसकडून मोहन बागानविरुद्ध ईडन गार्डन्सवर एक सामना खेळला होता. त्यानंतर आता अनेक दशकांनी ब्राझील फुटबॉल भारतात परतत आहे. (Brazil football team is likely to play a friendly match in Kolkata on October 2026)

ब्राझीलची 2026 फिफा विश्वचषकातील कामगिरी
अनुभवी आणि स्टार खेळाडूंचा भरणा असललेल्या ब्राझीलची फिफा विश्वचषक 2026 मध्ये निराशाजनक कामगिरी झाली. राऊंड ऑफ 16 मध्ये ते नॉर्वेकडून पराभूत होत स्पर्धेबाहेर झाले. त्यांच्याकडून व्हिनिसियस ज्युनियर चांगलाच फॉर्ममध्यो होता. त्याने चार गोलसह एक असिस्टही केला.

विक्रमी सहावे विजेतेपद जिंकण्याच्या इराद्याने स्पर्धेत उतरलेला ब्राझील 1990 नंतर प्रथमच विश्वचषकातून लवकरत बाहेर पडला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---