---Advertisement---

पेलेंसाठी प्रार्थना करा! फुटबॉल सम्राटाची प्रकृती खालावली; उपचारांना देत नाही प्रतिसाद

On: रविवार, डिसेंबर 4, 2022 12:40 AM
---Advertisement---

सध्या जगभरात फुटबॉल विश्वचषकाची चर्चा सुरू आहे. कतार येथे सुरू असलेल्या या स्पर्धेचे साखळी सामने संपले असून, उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू झाले आहेत. त्याचवेळी फुटबॉल तसेच संपूर्ण क्रीडाविश्वाला चिंतेत टाकणारी एक बातमी समोर येतेय. ब्राझीलचे माजी फुटबॉलपटू व फुटबॉलचे सम्राट मानल्या जाणाऱ्या पेले यांची प्रकृती ढासळली आहे.

फुटबॉलचे पहिले सुपरस्टार मानले जाणारे पेले सध्या अंथरुणाला खिळून आहेत. त्यांना कॅन्सरचे निदान झाले असून त्यांच्यावर‌ उपचार केले जातायेत. मात्र, ते उपचारांना प्रतिसाद देत नाहीत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, 82 वर्षीय पेले यांच्यावर कॅन्सर रुग्णांसाठी केली जाणारी किमोथेरपी सुरू आहे. मात्र, त्यांच्यावर याचा काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे त्यांना पॅलिएटीव केअरमध्ये ठेवले गेलेय. त्यांना सध्या श्वसनाचा त्रास होत असून, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार नाही.

फुटबॉल सम्राट मानल्या जाणाऱ्या पेले यांनी ब्राझील संघाला 1958, 1962 व‌ 1970 असे तीन वेळा विश्वविजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. त्यांच्या नावे ब्राझीलसाठी सर्वाधिक 77 गोल करण्याचा विक्रम आहे.

त्यांची तब्येत खराब झाल्यानंतर जगभरातील चाहते त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. फ्रान्सचा फुटबॉलपटू किलीयन एम्बाप्पे याने ट्विट करत लवकर बरे व्हा अशी प्रार्थना केली. तसेच नेदरलँड्स विरुद्ध अमेरिका या सामन्यातही अनेक चाहत्यांनी त्यांना बरे वाटावे याकरता पोस्टर्स झळकावले.

Brazil legend Pele has been moved to end of life care after he stopped responding to chemotherapy

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पीसीबी आशिया चषकातून माघार घेतानाही मागे पुढे पाहणार नाही! रमीझ राजांचे मोठे विधान
पीवायसी फिल्ट्रम चॅलेंजर करंडक निमंत्रित 25 वर्षाखालील गटाच्या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत 10 संघांचा समावेश 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---