मागच्या वर्षी भारतात आयसीसी वनडे विश्वचषक खेळला गेला. विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असून भारतीय संघाचे स्पर्धेतील प्रदर्शन जबरदस्त राहिले. संघ विश्वचषकाच्या आधीपासूनच वनडे क्रिकेटमध्ये जोरदार कामगिरी करत होता. याच पार्श्वभूमीवर ICC Men’s ODI Team of the Year मध्ये सर्वाधिक 6 खेळाडू भारतीय खेळाडूंनी जागा बनवली आहे. मंगळवारी (23 जानेवारी) आयसीसीकडून या संघाची घोषणा झाली.
ICC Men’s ODI Team of the Year 2023 मध्ये कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्मा याच्या खांद्यावर दिली गेली आहे. रोहितच्याच नेतृत्वात भारतीय संघ मागच्या वर्षी वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता. त्याव्यतिरिक्त शुबमन गिल, विराट कोहली, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी या पाच भारतीयांनाही संघात सामील केले गेले आहे. या सर्वांनीही भारताला विश्वचषक जिंकवून देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. पण अंतिम सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला.
Eight players that featured in the #CWC23 Final have made the cut for the ICC Men’s ODI Team of the Year in 2023 ✨
Details 👇https://t.co/AeDisari9B
— ICC (@ICC) January 23, 2024
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून मात मिळाली होती. याच ऑस्ट्रेलियन संघाकडून खेळणाऱ्या ट्रेविस हेड आणि ऍडम झॅम्पा यांनाही आयसीसीच्या वनडे संघात निवडले गेले आहे. दक्षिण आफ्रिकेचा हेनरिक क्लासेन आणि मार्क जेन्सन यांनाही संघात घेतले गेले आहे. न्यूझीलंडचा एकटा डॅरिल मिचेल या संघात स्थान बनवू शकला. (BREAKING! ICC 2023 ODI squad announced, 6 out of 11 players is Indian)
आयसीसी वनडे टीम ऑफ द ईयर 2023 –
रोहित शर्मा, शुबमन गिल, ट्रेविस हेड, विराट कोहली, डॅरिल मिचेल, हेनरिक क्लासेन, मार्को जेन्सन, ऍडम झॅम्पा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.
महत्वाच्या बातम्या –
आयसीसीने निवडला 2023 वर्षातील सर्वोत्तम टी-20 संघ, सूर्यकुमार यादवकडे दिली संघाची धुरा
IPL 2024: आयपीएलचा 17वा सीझन 22 मार्चपासून होणार सुरू, तर 26 मे रोजी होईल फायनल