क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. आगामी एसीसी पुरुष इमर्जिंग आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी भारत अ संघाची निवड करण्यात आली आहे. एसीसी पुरुष इमर्जिंग आशिया चषक 2023 स्पर्धा 13 ते 23 जुलै यादरम्यान कोलंबो, श्रीलंका येथे पार पडणार आहे. आठ आशियाई संघात पार पडणारी ही स्पर्धा 50 षटकांच्या क्रिकेट प्रकारात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत दोन गट पाडले गेले आहेत.
भारत अ (India A) संघ संघाच्या कर्णधारपदाची धुरा यश धूल (Yash Dhull) या खेळाडूकडे सोपवली आहे. एसीसी पुरुष इमर्जिंग आशिया चषक 2023 स्पर्धेत दोन गट असून भारत अ संघ ‘ब’ गटात आहे. या गटात भारतासोबत नेपाई, यूएई अ आणि पाकिस्तान अ संघाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त श्रीलंका अ, बांगलादेश अ, अफगाणिस्तान अ आणि ओमान अ हे संघ ‘अ’ गटात आहेत. या दोन्ही गटातील अव्वल संघ स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात प्रवेश मिळवतील.
स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना अ गटातील अव्वल संघ विरुद्ध ब गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या संघासोबत भिडेल. तसेच, दुसऱ्या उपांत्य सामन्यात ब गटातील अव्वल संघ विरुद्ध अ गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ आमने-सामने असतील. हे दोन्ही सामने 21 जुलै रोजी खेळले जाणार असून स्पर्धेचा अंतिम सामना 23 जुलै रोजी खेळला जाईल. (Breaking India A squad for ACC Men’s Emerging Teams Asia Cup 2023 announced)
भारत अ संघ-
साई सुदर्शन, अभिषेक शर्मा (उपकर्णधार), निकिन जोस, प्रदोष रंजन पॉल, यश धूल (कर्णधार), रियान पराग, निशांत सिंधू, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), मानव सुथार, युवराजसिंह डोडिया, हर्षित राणा, आकाश सिंग, नितीशकुमार रेड्डी, राजवर्धन हंगरगेकर
NEWS – India A squad for ACC Men’s Emerging Teams Asia Cup 2023 announced.
More details here – https://t.co/TCjU0DGbSl pic.twitter.com/6qCDxfB17k
— BCCI (@BCCI) July 4, 2023
राखीव खेळाडू-
हर्ष दुबे, नेहाल वढेरा, स्नेल पटेल, मोहित रेडकर
कोचिंग स्टाफ-
सितांशु कोटक (मुख्य प्रशिक्षक), साईराज बहुतुले (गोलंदाजी प्रशिक्षक), मुनीष बाली (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक)
स्पर्धेतील भारत अ संघाचे वेळापत्रक
पहिला सामना- भारत अ विरुद्ध यूएई अ, 13 जुलै (गुरुवार), (मैदान- एसएससी)
दुसरा सामना- भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ, 15 जुलै (शनिवार), (मैदान- एसएससी)
तिसरा सामना- भारत अ विरुद्ध नेपाळ, 18 जुलै (मंगळवार), (मैदान- पी सारा ओव्हल)
उपांत्य सामना 1 (अ गटातील पहिला आणि ब गटातील दुसरा संघ), 21 जुलै (शुक्रवार), (मैदान- आरपीआयसीएस)
उपांत्य सामना 2 (ब गटातील पहिला आणि अ गटातील दुसरा संघ), 21 जुलै (शुक्रवार), (मैदान- पी सारा ओव्हल)
अंतिम सामना, 23 जुलै (रविवार), (मैदान- आरपीआयसीएस)
महत्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! इंग्लंडचा हुकमी एक्का ऍशेस 2023मधून बाहेर, लगेच वाचा
अशी वेळ कुणावरही येऊ नये! वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी हरभजन जोरदार ट्रोल, नेटकरी म्हणाला, ‘पेग लावून…’