क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू घडले आहेत जे त्यांच्या अप्रतिम रेकाॅर्ड्समुळे प्रसिद्ध आहेत. यातील काही रेकाॅर्ड असे आहेत की ते मोडणे कठीण आहे. पण क्रिकेटच्या इतिहासात असे काही रेकाॅर्ड आहेत, जे तोडण्यासाठी नवी खेळाडूंना खूप मेहनत करावी लागेल. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सच्या (AB De Villiers) रेकाॅर्डबद्दल जाणून घेऊया. त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत असे अनेक रेकाॅर्ड केले आहेत जे आजपर्यंत कोणीही मोडू शकले नाही.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याचा रेकाॅर्ड एबी डिव्हिलियर्सच्या (AB De Villiers) ) नावावर आहे. त्याने 2015 मध्ये वेस्ट इंडिजविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यात 31 चेंडूत सर्वात जलद शतक झळकावले होते. त्यानंतर त्याचा रेकॉर्ड अद्याप कोणीही मोडू शकले नाही.
सर्वात वेगवान अर्धशतक- वेगवान शतकानंतर सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा रेकाॅर्ड त्याच्या नावावर आहे. एबी डिव्हिलियर्सने (AB De Villiers) वनडे क्रिकेटमध्ये अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक झळकावले आहे.
सर्वोच्च स्ट्राइक रेट- वनडे क्रिकेटमध्ये शतकादरम्यान सर्वाधिक स्ट्राइक रेटचा रेकाॅर्ड एबी डिव्हिलियर्सच्या (AB De Villiers) नावावर आहे.
शतकातील आश्चर्यकारक रेकॉर्ड- एकदिवसीय क्रिकेटमध्ये 25 षटकांत सर्वाधिक शतके ठोकण्याचा रेकाॅर्ड एबी डिव्हिलियर्सच्या (AB De Villiers) नावावर आहे. 25 षटकांनंतर फलंदाजी करताना त्याने एकूण 5 शतके ठोकली आहेत.
बाद होण्यापूर्वी 78 डाव- कसोटी क्रिकेट खेळताना शून्यावर बाद होण्यापूर्वी 78 डाव खेळण्याचा रेकाॅर्ड एबी डिव्हिलियर्सच्या (AB De Villiers) नावावर आहे. बांगलादेशविरूद्ध डिव्हिलियर्स पहिल्यांदाच शून्यावर बाद झाला होता. त्याआधी त्याने 78 डाव खेळले होते. पण असा रेकाॅर्ड आजपर्यंत एकाही फलंदाजाला करता आला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
चेतेश्वर पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 18व्यांदा झळकावले शानदार द्विशतक!
WTC FINALच्या बाहेर पडले ‘हे’ 4 संघ! उर्वरित सामने जिंकूनही नाही फायदा?
“बाॅर्डर-गावस्कर ट्राॅफी खेळणार पण…” पुनरागमनाबद्दल मोहम्मद शमी काय म्हणाला?