भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पर्थ कसोटी सामन्याबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज ब्रेंडन ज्युलियननं धाडसी भविष्यवाणी केली आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टीम इंडियाची धुरा सांभाळताना दिसू शकतो, कारण रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना खेळणार नाही.
यावेळी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये चार नव्हे तर पाच कसोटी सामने खेळले जाणार आहेत. याशिवाय ज्युलियननं असाही दावा केला की, स्टार क्रिकेटपटू विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यात आपसात जमत नाही. ऑस्ट्रेलियासाठी सात कसोटी आणि 25 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या या वेगवान गोलंदाजानं दावा केला की, ऑस्ट्रेलिया पर्थ कसोटी केवळ चार दिवसांत जिंकेल.
ब्रेंडन ज्युलियन ‘फॉक्स क्रिकेट’शी बोलताना म्हणाला, “ऑस्ट्रेलिया अवघ्या चार दिवसांत भारताला हरवेल. टीम इंडियासाठी काही गोष्टी त्रासदायक आहेत. वरच्या फळीत पाहा. रोहित शर्मा तेथे नसेल. तो पहिला कसोटी सामना खेळू शकणार नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराह संघाचं नेतृत्व करेल. जेव्हा तुम्ही ओपनिंग बॉलर असता आणि कर्णधार बनता तेव्हा दबाव खूप वाढतो. तो महान गोलंदाज आहे, यात शंका नाही. परंतु जेव्हा तुम्ही गोलंदाजीला सुरुवात करता आणि कर्णधारही असता, तेव्हा परिस्थिती खूप बदलते.”
ज्युलियन पुढे म्हणाला, “न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहली ज्या प्रकारे बाद झाला, त्या पद्धतीनं आऊट होणं खूपच आश्चर्यकारक होतं. कोहली त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नाही. त्याला कदाचित कर्णधार आणि प्रशिक्षकाची साथ मिळत नाही. परंतु हे सर्व असूनही तो पटकन परिस्थिती बदलू शकतो. पण मला वाटतं की पर्थमध्ये त्याच्यासाठी गोष्टी सोप्या नसतील.”
हेही वाचा –
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला शिखर धवन या लीगमध्ये खेळणार! प्रथमच होतंय आयोजन
कसोटी वाचवण्यासाठी कोणता भारतीय खेळाडू 11 तास फलंदाजी करू शकतो? कोच गंभीरनं दिलं अनोखं उत्तर
आरसीबीनं रिलिज केल्यानंतर दोन आठवड्यातच ठोकलं त्रिशतक! मेगा लिलावात या खेळाडूवर लागू शकते मोठी बोली