सध्या भारतातील विविध शहरांमध्ये इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल 2023) सोळावा हंगाम खेळला जात आहे. पहिल्या दोन आठवड्यात प्रेक्षकांना अत्यंत थरारक लढती पाहायला मिळाल्या. याच आयपीएल इतिहासातील सर्वात पहिला सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅकलम आता आयपीएल संबंधित एका प्रकरणामुळे अडचणीत आला आहे. या प्रकरणात त्याच्यावर कडक कारवाई देखील होऊ शकते.
सध्या इंग्लंडच्या कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षकपद भूषवत असलेला मॅकलम एका बेटिंग कंपनीची जाहिरात केल्यामुळे अडचणीत आला आहे. मागील महिन्यात मॅकलम याने एका बेटिंग कंपनीशी ब्रँड अँबेसिडर म्हणून करार केला. त्यानंतर त्याने या कंपनीची जाहिरात आपल्या सोशल मीडिया हँडलवरून केली. याच जाहिरातीचा मुद्दा इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्ड आणि न्यूझीलंडच्या गॅम्बलिंग फाउंडेशनला खटकला आहे.
ईसीबी सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. हे प्रकरण इसीबीच्या अँटी करप्शन विभागाकडे द्यायचे की नाही हे ईसीबी ठरवेल. ईसीबीच्या नियमानुसार, संघाशी निगडित कोणताही व्यक्ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या सट्टेबाजीचे समर्थन करू शकत नाही. कोणीही अशाप्रकारे जाहिरात करून लोकांना सट्टेबाजीसाठी प्रोत्साहित करत असेल तर त्याच्यावर कारवाई होते. या प्रकरणात दोषी सापडल्यास एक वर्षाची बंदी त्या व्यक्तीवर घालण्यात येते.
मॅकलम हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक मान्यवर क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. आयपीएलमध्ये त्याने कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स, गुजरात लायन्स, कोची व आरसीबी या संघाचे प्रतिनिधित्व केले. तसेच, मागील हंगामात तो केकेआरचा मुख्य प्रशिक्षक देखील त्यानंतर त्याने इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला. (Brendon McCullum Enquiry Cause Of Promoting Betting Site)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेपटून लग्नबंधनात, मोठ्या काळापासून रिलेशनमध्ये असलेल्या मैत्रिणीसोबत थाटला संसार
लसिथ मलिंगाचा सर्वात मोठा आयपीएल विक्रम उद्ध्वस्त! हंगामातील पहिल्याच सामन्यात रबाडाची मोठी कामगिरी