---Advertisement---

आयपीएल इतिहासातील पहिल्याच सामन्यात वादळी खेळी करणाऱ्या ब्रँडन मॅक्युलमला गांगुली म्हणाला होता, तूझे आयुष्य…

On: गुरूवार, सप्टेंबर 10, 2020 2:49 PM
---Advertisement---

मुंबई ।  कोलकाता नाइट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम याने आयपीएल 2008 मध्ये केलेल्या 158 धावांच्या स्फोटक खेळीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मॅक्यूलमने या खेळीबद्दल त्यावेळीचा केकेआरचा कर्णधार सौरव गांगुलीने काय सांगितले होते, याचा खुलासा केला आहे.

केकेआरच्या संकेतस्थळावर बोलताना ब्रँडन मॅक्युलम सांगितले  की, सौरव गांगुलीच्या विधानाचा अर्थ समजण्यास त्याला बरीच वर्षे लागली. तो म्हणाला, “गांगुलीने त्या खेळीनंतर मला सांगितले की, तुझे आयुष्य कायमचे बदलले आहे आणि त्यावेळी मला त्या गोष्टीचा अर्थ अजिबात ठाऊक नव्हता. जरी मी कुठेतरी 100 टक्के त्याच्याशी सहमत आहे.”

ब्रँडन मॅक्युलमने आयपीएलच्या इतिहासातील पहिल्या सामन्यात एक जबरदस्त खेळी खेळली.  त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध अवघ्या 73 चेंडूत 158 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. मॅक्युलमच्या खेळीमुळे संपूर्ण आयपीएलला वेग आला होता. त्यानंतर आयपीएलला जबरदस्त यश मिळाले आहे. 12 हंगाम संपल्यानंतरही चाहते ती खेळी विसरले नाहीत.

या आयपीएलच्या हंगामात ब्रँडन मॅक्युलम हा केकेआरचा मुख्य प्रशिक्षक आहे. प्रशिक्षक म्हणून त्याला आपल्या संघाला विजेतेपद द्यायचे आहे.

मॅक्युलम यापूर्वी म्हणाला होता की, “केकआर फ्रेंचायझीने मला जी संधी दिली त्याबद्दल मी नेहमीच त्यांचे आभारी राहीन. संघ मालक शाहरुख खानने मला सांगितले की, तू नेहमी नाइट रायडर्स बरोबर राहशील. म्हणून जेव्हा मला पुन्हा केकेआर संघात सामील होण्याची संधी मिळाली, तेव्हा शाहरुखचे वाक्य आठवते. मला वाटलं ही आणखी एक संधी आहे.”

“त्या रात्री 3 तासांनी माझे आयुष्य पूर्णपणे बदलले. यामुळे माझ्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य कायमचे बदलले, यासाठी मी स्वत: ला भाग्यवान समजतो. माझ्या सहकाऱ्यांशिवाय मी हे सर्व साध्य करू शकलो नसतो, “असेही ब्रँडन मॅक्युलम याने सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---