इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगाम सध्या भारतात जोरदार सुरू असून अखेरच्या टप्प्यात आला आहे. या हंगामात अनेक दिग्गज खेळाडू खेळताना दिसले आहेत. इतकेच नाही, तर अनेक महान खेळाडूही विविध संघांच्या सपोर्ट स्टाफशी जोडले गेले आहे. यात वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ब्रायन लारा यांचा देखील समावेश आहे. लारा आयपीएल २०२२ मध्ये सनरायझर्स हैदराबादच्या संघाचा फलंदाजी प्रशिक्षक आणि धोरणात्मक सल्लागार आहेत. असे असले तरी, आजही त्यांची फलंदाजीची शैली पूर्वीसारखीच आहे, हे दाखवणारा एक व्हिडिओ सनरायझर्सने शेअर केला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० हून अधिक सामने खेळलेल्या लारा (Brian Lara) यांनी १९९० साली वेस्ट इंडिजसाठी (West Indies Cricket) पदार्पण केले होते, तर २००७ साली ते अखेरचे राष्ट्रीय संघाकडून खेळले. जवळपास १७ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या लारा यांच्याच नावावर कसोटीतील सर्वाधिक नाबाद ४०० धावांची खेळी करण्याचा विक्रमही आहे. त्यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ४३० सामन्यांतील ५२१ डावात खेळताना ४६.२८ च्या सरासरीने २२३५८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्यांच्या ५३ शतकांचा आणि १११ अर्धशतकांचा समावेश आहे.
सध्या ते सनरायझर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) सपोर्ट स्टाफचा भाग असून युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसतात. पण, नुकतेच ते सनरायझर्स हैदाराबादच्या सराव सत्रादरम्यान फलंदाजी करतानाही दिसले होते. यावेळी त्यांनी चांगले फटकेही मारले. त्यांच्या फलंदाजीचा व्हिडिओ सनराझर्स हैदराबादने (SRH) सोशल मीडियावर शेअर केला असून त्याला ‘गोंधळून जाऊ नका, हे वर्ष २०२२ आहे, नव्वदचे दशक नाही. पण काही महान गोष्टी नेहमीच सारख्या राहतात. या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत आहे.
दरम्यान, महत्त्वाची गोष्ट अशी की लारा यांनी खेळाडू म्हणून कधीही आयपीएल खेळलेले नाही.
Don't be confused. It's 2022, not the 90s. But some things always remain the same legendary way. 🏏🧡@BrianLara | #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/06QddvQ9zq
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 13, 2022
हैदराबाद गुणतालिकेत ७ व्या क्रमांकावर
आयपीएल २०२२ हंगामात केन विलियम्सनच्या (Kane Williamson) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादने आत्तापर्यंत ११ सामन्यांत ५ विजय आणि ६ पराभव पत्करले आहेत. त्यामुळे ते सध्या १० गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. त्यांच्यासाठी प्लेऑफचे दरवाजे खुले आहे, पण त्यासाठी त्यांना उर्वरित तिन्ही साखळी फेरीतील सामने महत्त्वाचे आहेत.
खरंतर हैदराबाद या हंगामातील पहिले दोन सामने पराभूत झाल्यानंतर विजयी मार्गावर आले होते. त्यांनी सलग ५ सामने जिंकले होते. पण, त्यानंतर त्यांची विजयाची गाडी पुन्हा रुळावरून घसरली. सलग ५ विजयानंतर हैदराबादला सलग ४ पराभवांना सामोरे जावे लागले आहे. त्याचमुळे त्यांचा प्लेऑफपर्यंतचा प्रवास खडतर झाला आहे.
प्लेऑफमध्ये सध्या केवळ गुजरात टायटन्सने जागा पक्की केली आहे, तर चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेले आहेत. त्यामुळे सध्या ७ संघात प्लेऑफमधील उर्वरित ४ जागांसाठी जोरदार स्पर्धा आहे. यात सनरायझर्स हैदराबादचाही समावेश आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
मोठ्या विजयानंतरही मयंक दिसला नाराज, विराटने काढली समजूत; पाहा दोघांमधील संभाषणाचा Video
“धोनी जर खेळणार नसेल, तर त्याने मेंटर किंवा कोच व्हावं”