भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा (Brian Lara) हे जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहेत. त्यांच्या कारकिर्दीमध्ये दोन्ही दिग्गजांनी अनेक रेकाॅर्ड मोडले आणि त्यापैकी बरेच रेकाॅर्ड आजही आहेत. जे कोणी तोडू शकलं नाही. दोन्ही दिग्गजांच्या नावावर अनेक रेकाॅर्ड असूनही लारानं स्वत: किंवा सचिन तेंडुलकला जगातील महान फलंदाज म्हटलं नाही.
सचिन तेंडुलकर अजूनही कसोटीमध्ये 15,921 सर्वाधिक धावा आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 18,426 सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याबरोबरच कसोटी क्रिकेटमध्ये 400 धावा आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 501 धावा करण्याचा रेकाॅर्ड दिग्गज खेळाडू ब्रायन लाराच्या नावावर आहे. जो आजपर्यंत कोणताही खेळाडू या रेकाॅर्डच्या आसपास पोहचू शकला नाही.
लारा म्हणाला की, कार्ल हूपर (Carl Hooper) हा आतापर्यंतचा सर्वोत्तम खेळाडू आहे. लाराने त्याच्या नवीन पुस्तकात याचा खुलासा केला आहे. त्यानं लिहिलं की, “कार्ल हूपर निश्चितपणे मी पाहिलेल्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. मी म्हणेन की तेंडुलकर आणि मीसुद्धा त्याच्या प्रतिभेजवळ जाऊ शकत नाही. जर आपण कार्लची कारकीर्द खेळण्यापासून कर्णधारपदापर्यंत वेगळी केली तर त्याची आकडेवारी खूप वेगळी आहे. कर्णधार म्हणून त्याची फलंदाजी सरासरी 50च्या जवळ होती. त्यामुळं त्यानं जबाबदारीचा आनंद लुटला. एक कर्णधार म्हणून त्यानं आपली खरी क्षमता पूर्ण केली”
पुढे बोलताना लारा म्हणाला, “वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्सला त्याच्यापेक्षा हूपरवर जास्त प्रेम होतं. पण, आपल्यापेक्षा कोणीही चांगलं होऊ नये असं त्याला वाटत होतं. हे सांगणं महत्त्वाचं आहे की, व्हिव्हयन रिचर्ड्स कधी कोणावरह रडला नाही. कारण त्याला त्याच्यासारखा महान बनायचं नव्हतं. त्याचा कणखरपणा हे त्याचं व्यक्तिमत्त्व होतं, पण आपण चांगली कामगिरी करू नये असं त्याला कधीच वाटलं नाही. तो तसाच होता आणि बघा, रिचर्ड्सला कार्ल आवडत होता. माझ्यापेक्षा जास्त, हे खरं आहे.”
कार्ल हूपरनं (Carl Hooper) त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये 102 कसोटी सामने आणि 227 एकदिवसीय सामने खेळले आहेत. 102 कसोटी सामन्यानं हूपरनं 36.46च्या सरासरीनं 5,762 धावा ठोकल्या आहेत. त्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 233 राहिली आहे. तर कसोटीमध्ये त्याच्या नावावर 13 शतक आणि 27 अर्धशतक आहेत. 227 एकदिवसीय सामन्यात त्यानं 5,761 धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 113 नाबाद राहिली आहे. त्यामध्ये त्यानं 7 शतक तर 29 अर्धशतक झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘फक्त स्टार खेळाडूंनाच मान, इतरांकडे…’; माजी खेळाडूने सांगितलं आरसीबीचं डार्क सीक्रेट
एकेकाळी होते टीम इंडियाचे मॅचविनर खेळाडू…आता संधीसाठी झगडत आहेत! निवृत्ती हाच शेवटचा पर्याय
पाकिस्तानातही बुमराहच्या नावाचा डंका! चिमुकल्याने केली बॉलिंग ऍक्शनची नक्कल, Video व्हायरल