---Advertisement---

४०० धावांचा विक्रम मोडण्यासाठी रोहित, विराटला करावे लागेल हे काम…

On: सोमवार, डिसेंबर 16, 2019 7:16 PM
---Advertisement---

वेस्ट इंडीजचा माजी फलंदाज ब्रायन लाराने म्हटले आहे की विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला आयसीसीच्या प्रमुख टूर्नामेंट्समधील बाद फेरीतील सामन्यांमध्ये विजय मिळवण्यासाठी एक मार्ग शोधावा लागेल. तसेच विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे फलंदाज कसोटीत माझा 400 धावांचा विक्रम मोडू शकतात, असेही ते म्हणाले.

ते म्हणाले की, विराट आणि रोहित पूर्ण दिवस किंवा दीड दिवस फलंदाजी केल्यास निश्चितपणे हा विक्रम मोडू शकतात. आशा आहे, मी हा दिवस पाहिल.

शनिवारी दृष्टीबाधिक महिलांसाठी पहिला राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेची घोषणा करताना एका कार्यक्रमात लारा म्हणाले, प्रत्येकजण भारताला दावेदार म्हणतो. भारतीय संघ उपांत्य फेरीत किंवा बाद फेरीत स्थान मिळवणार आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे.

लारा यांना असे वाटते की भारताने 70 च्या दशकाच्या वेस्ट इंडीज किंवा गेल्या दशकाच्या ऑस्ट्रेलियन संघाप्रमाणेच सातत्याने जिंकण्याची क्षमता विकसित केली पाहिजे. 

यावर्षी इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेचा संदर्भ देताना ते म्हणाले की उपांत्यपूर्व किंवा उपांत्यफेरी असो प्रत्येक संघ अशा सामन्यासाठी सज्ज असतो. न्यूझीलंडने भारताविरुद्ध कसे खेळले ते पहा, कोणाला लक्ष्य करावे आणि काय करावे हे त्यांना ठाऊक होते.’

म्हणून भारताने त्याचे कौतुक केले पाहिजे. आयसीसीच्या सलग चार स्पर्धांच्या बाद फेरीतील सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला आहे.

2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यापासून भारतीय संघाने आयसीसीच्या सर्व स्पर्धांमध्ये  बाद फेरी गाठली आहे, परंतु विजेतेपद कधीही जिंकले नाही. एमएस धोनीच्या नेतृत्वात 2014  विश्वचषक टी20 च्या अंतिम फेरीत , 2015 विश्वचषकात उपांत्य फेरीत, 2016 टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताला पराभवाला सामोरे जावे लागेल.

नंतर विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना आणि 2019 क्रिकेट विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली पण विजेतेपद खूप दूर राहिले .

https://twitter.com/Maha_Sports/status/1205479939396341768

https://twitter.com/Maha_Sports/status/1205478168577994752

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---