भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यात ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला १८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघ पराभूत झाला असला तरीही हरलीन देओलने टिपलेला एक झेल सध्या चर्चेचा विषय बनून आहे. या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या सामन्यात भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघातील फलंदाजांनी तुफान फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले आहे. नताली स्केयरने अवघ्या २७ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. तर ॲमी जोन्सने २७ चेंडूत ४३ धावांचे योगदान दिले. तसेच डॅनी वॅटने देखील ३१ धावांची तुफानी खेळी केली होती. २० षटक अखेर इंग्लंड महिला संघाला ७ बाद १७७ धावा करण्यात यश आले होते.
हरलीन देओलचा अप्रतिम झेल
पहिल्या डावातील १९ व्या षटकात भारतीय महिला संघाकडून हरलीन देओलने एक अप्रतिम झेल टिपल्याचे पाहायला मिळाले आहे. इंग्लंड संघाकडून तुफान फटकेबाजी करत असलेल्या जोन्सने शिखा पांडेच्या चेंडूवर डीपमध्ये शॉट खेळला होता. सर्वांना वाटले होते की, तो चेंडू आरामात सीमारेषेच्या बाहेर जाईल. परंतु हरलीन देओलने उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर केला.
हरलीनने सीमारेषेजवळ उंच उडी मारत आधी झेल टिपला त्यानंतर तिला जाणवले की, तिचा तोल जाऊन ती सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकते. त्यावेळी तिने चेंडू काही वेळ हवेतच उडवला आणि सीमारेषेच्या बाहेर गेली. त्यानंतर पुन्हा आत येऊन तिने डाईव्ह हा अप्रतिम झेल टिपला. या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अनेकांनी तर तिची भारताचा अव्वल क्षेत्ररक्षक रविंद्र जडेजाशी तुलना केली आहे. (Brilliant catch taken by Harleen deol in first T20I against England )
Superb athleticism and a stunning catch by Harleen Deol. Cricket fielding at its very best. pic.twitter.com/nVde2PWQSF
— Mazher Arshad (@MazherArshad) July 9, 2021
Beaut @imharleenDeol #ENGvIND pic.twitter.com/ka2kRJgkNC
— Isa Guha (@isaguha) July 9, 2021
किसी कैप्शन की जरूरत भी है क्या 😲#ENGvIND @imharleenDeol @BCCIWomen
🎥 @englandcricketpic.twitter.com/UVTOOiMvir
— ESPNcricinfo हिंदी (@CricinfoHindi) July 9, 2021
भारतीय संघ १८ धावांनी पराभूत
या सामन्यातील दुसऱ्या डावात पावसाचे आगमन झाले होते. त्यामुळे भारतीय संघाला डकवर्थ लुईस नियमानुसार ८.४ षटकात ७३ धावा करायच्या होत्या. परंतु भारतीय संघाला ८.४ षटकात अवघ्या ५४ धावा करण्यात यश आले. या मालिकेत इंग्लंड संघाने १-० ने आघाडी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या-
कोरोना इफेक्ट! भारत-श्रीलंका मालिकेच्या वेळपत्रकात बदल, १३ जुलै नव्हे ‘या’ दिवशी होणार सुरुवात
‘या’ कारणामुळे सुनील गावसकर घालत नसत हेल्मेट, स्वतःच केला होता खुलासा
इंग्लंडकडून खेळणाऱ्या ‘या’ पाकिस्तानी वंशाच्या गोलंदाजाने मोडले पाकिस्तानी फलंदाजीचे कंबरडे