बीबीएल 2023-24 हंगामाचे विजेतेपद बुधवारी (24 जानेवारी) ब्रिस्बेन हीट संघाने मिळवले. अंतिम सामन्यात ब्रिस्बेन हीटकडून सिडनी सिक्सर्स संघाचा 54 धावांनी पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना ब्रिस्बेनने 20 षटकांमध्ये 8 विकेट्सच्या नुकसानावर 166 धावा केल्या. प्रत्युत्तरात 17.3 षटकांमध्ये सिडनी संघ 112 धावा करून सर्वबाद झाला. स्पेंसर जॉन्सन सामनावीर पुरस्कासाचा मानकरी देखील ठरला.
नाणेफेक गमावल्यानंतर ब्रिस्बेन हीट संघ प्रथम फलंदाजीला आला. संघाला बीसीसीएलच्या अंतिम सामन्यात अपेक्षित सुरुवात करता आली नाही. सलामीवीर जिमी पियर्सन 4 धावा करून तंबूत परतला. दुसरा सलामीवीर जोश ब्राऊन आणि कर्णधार नाथन मॅकस्वीनी यांनी दुसऱ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली. मॅकस्वीनी याने 32 चेंडूत 33 धावा केल्या आणि संघाची धावसंख्या 90 असताना विकेट गमावली. ब्राऊनने अर्धशतक केले आणि 53 धावा करून 13 व्या षटकात तंबूत परतला. मॅक्स ब्रयांट याने 19 चेंडूत 29 धावांची खेळी केली. तसेच मॅठ रेनशॉ याने 22 चेंडूत 40 धावा करून संघाची धावसंख्या 166 पर्यंत पोहोचवली. रेनशॉ डावातील शेवटच्या चेंडूवर बाद झाला. सिडनी सिक्सर्सकडून सीन ऍबॉट याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
They brought the HEAT 🏆
Brisbane are #BBL13 champions! pic.twitter.com/QDrTMY01w8
— KFC Big Bash League (@BBL) January 24, 2024
प्रत्युत्तरात सिडनी सिक्सर्स संघालाही अपेक्षित सुरुवात मिळाली नाही. सलामीवीर डॅनियल ह्यूज याने पहिल्याच षटकात एक धाव करून विकेट गमावली. मायकल नेसरने त्याची विकेट घेतली. जॅक ऍडवर्डने 16 आणि जोश फिलिपने 23 धावांची खेळी केली. झईन सिल्क एकही धाव करू शकला नाही. संघाची धावसंख्या 57 असताना चार फलंदाजांनी विकेट्स गमावल्या. कर्णधार मायसेस हेनरिक्स याने ऍबॉट याला 16 धावांवर बाद केले. एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. याच कारणास्तव सिडनी सिक्सर्स संघ 17.3 षटकांमध्ये सर्वबाद झाला.
That champion sound 🎶@HeatBBL #BBL13 pic.twitter.com/7Hzxxs0f72
— KFC Big Bash League (@BBL) January 24, 2024
ब्रिस्बेन हीट संघाकडून स्पेंसर जॉन्सन याने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तसेच जेवियन बार्टलेट आणि मिचेल स्वेप्सन यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. (Brisbane Heat Won the BBL trophy after 11 years)
महत्वाच्या बातम्या –
एनइसीसी डेक्कन आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामीदिप्ती, झील देसाई यांची आगेकूच
राज्य बुद्धिबळ स्पर्धा शुक्रवारी, विनायक नवयुग मित्र मंडळ आणि हिंद शक्ती सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजन