पॅरिस ऑलिम्पिकच्या तिसऱ्या दिवशी (29 जुलै) एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. ऑलिम्पिकमध्ये कोविड-19 व्हायरसचा शिरकावा झाला आहे. सोमवारी, ब्रिटीश जलतरणपटू ॲडम पीटी याला कोविड -19 ची लागण झाल्याचं आढळलं. विशेष म्हणजे, कोविडची लागण होण्यापूर्वी पीटीनं पुरुषांच्या 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये रौप्य पदक जिंकलं होतं. मात्र, या सामन्यादरम्यानही त्याला अस्वस्थ वाटत होतं.
ॲडम पीटी कोविड पॉझिटिव्ह झाल्यानंतर ब्रिटीश टीमनं एक निवेदन जारी केलं. पीटीची कोविड चाचणी सोमवारी करण्यात आली आणि तो पॉझिटिव्ह आढळला. याच्या एक दिवस आधी अस्वस्थ वाटत असतानाही त्यानं 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये रौप्य पदक जिंकलं होतं. रविवारी पुरुषांच्या 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोकच्या अंतिम फेरीपूर्वी ॲडम पीटीला अस्वस्थ वाटू लागलं. अंतिम फेरीच्या काही तासांनंतर त्याची लक्षणं आणखीन वाढली. यानंतर सोमवारी सकाळी त्याची कोविड चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रविवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात ॲडम पीटी इटलीच्या निकोलो मार्टिनेघी याच्या पेक्षा 0.02 सेकंदांनी मागे राहिला. त्यामुळे पीटीला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. सामन्यादरम्यान त्याला पाहून तो आजारी असल्याचं अजिबात वाटत नव्हतं. पीटी दोन वेळचा 100 मीटर स्विमिंग चॅम्पियन देखील आहे.
कोव्हिड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर प्रतिक्रिया देताना पीटी म्हणाला, “हे अजिबात निमित्त नाही, कारण मला बिलकूल वाटत नाही की हे निमित्त व्हावं. मात्र हा एक असा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर मला द्यावं लागेल”. सामना संपल्यानंतर पीटीला घसादुखीमुळे बोलण्यात त्रास होत होता.
हेही वाचा –
गुलाबी साडी घालून नीता अंबानींचा पॅरिसमध्ये जबरदस्त भांगडा, व्हिडिओ तुफान व्हायरल
पॅरिस ऑलिम्पिक 2024 : भारत-अर्जेंटिना सामना सुटला बरोबरीत, शेवटच्या क्षणी हरमनप्रीतची चमकदार कामगिरी
पॅरिस ऑलिम्पिकला गालबोट, कमेंट्रीदरम्यान समालोचकाची जीभ घसरली; चॅनलनं उचललं मोठं पाऊल