---Advertisement---

पॅरिस ऑलिम्पिक 2024 : भारत-अर्जेंटिना सामना सुटला बरोबरीत, शेवटच्या क्षणी हरमनप्रीतची चमकदार कामगिरी

---Advertisement---

पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या हाॅकी सामन्यात भारत आणि अर्जेंटिना आमने-सामने होते. या सामन्यात दोन्ही संघांचे गुण 1-1 अशी बरोबरीत येऊन सुटले. भारतीय संघ शेवटपर्यत पिछाडीवर होता. पण भारतीय संघानं अगदी शेवटच्या क्षणी सामन्याची दिशा बदलली. भारत जवळपास 58 मिनिटे 1-0 ने पिछाडीवर होता. मात्र यानंतर अखेरच्या मिनिटांत भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली.

भारतीय संघासाठी हरमनप्रीत सिंगने (Harmanpreet Singh) शेवटच्या मिनिटांत गोल करत भारताच निश्चित वाटत असलेला पराभव टाळला. तत्पूर्वी अर्जेंटिनाने दुसऱ्या क्वार्टरमध्ये एक गोल केला. त्यामुळे अर्जेंटिनाचा संघ 1-0 ने पुढे गेला. यानंतर भारतीय खेळाडू गोल करण्यासाठी धडपडत राहिले, मात्र त्यांना यश मिळाले नाही. मात्र अखेरच्या क्षणी भारताला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोल करत संघाला बरोबरीत आणून ठोवले.

हरमनप्रीतनं केलेल्या चमकदार कामगिरीमुळे भारताचा पराभव होण्यापासून टळला. आता भारताचा पुढचा सामना आयर्लंडविरुद्ध आहे. शेवटच्या सामन्यात भारतानं न्यूझीलंड संघाला पराभूत करुन विजयी सलामी दिली होती. तर आता अर्जेंटिनाविरुद्ध झालेला सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे भारत या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडियाबाहेर असलेल्या पृथ्वीचा इंग्लंडमध्ये जबरदस्त ‘शो’, केवळ इतक्या चेंडूत फटकावल्या 76 धावा
नेहराने यशस्वी जयस्वालची घेतली फिरकी; म्हणाला, “रोहित-विराट असते तर, तू नेटमध्ये…”
स्टीव्ह स्मिथच्या संघानं उंचावली मेजर लीग क्रिकेटची ट्राॅफी…!!!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---