क्रिकेट खेळात कधी कोणता विक्रम होईल काही सांगू शकत नाही. म्हणूनच क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटले जाते. सलग सहा चेंडूत सहा षटकार, सहा चेंडूत सहा चौकार, सर्वाधिक जलद शतक-अर्धशतक, जबरदस्त झेल असे किती तरी विक्रम आपण क्रिकेटमध्ये पाहतो. हल्लीच असाच एक विक्रम काउंटी क्रिकेट क्लब मधील सामन्यांत पाहण्यास मिळाला.
बकडन क्रिकेट क्लब आणि फाल्कन्स हंटिंगडनशायर यांच्यात नुकताच एक सामना झाला. या सामन्यात फाल्कन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २६१ धावांचे लक्ष्य दिले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना बकडन संघ अवघ्या २ धावांवर सर्वबाद झाला. इतकेच नाही तर, संघातील एकही फलंदाजाला खातेही उघडता आले नाही.
बकडन संघ २६१ धावांचा पाठलाग करताना तब्बल २५८ धावांनी पराभूत झाला. मजेशीर गोष्ट म्हणजे बकडन संघाच्या ज्या दोन धावा धावफलकावर दिसत होत्या त्या दोन धावां पैकी एक धाव वाइड चेंडू फेकल्यामुळे आणि दुसरी धाव लेग बाइज स्वरुपात आली. या अतिरिक्त धावां व्यतिरिक्त एकही धाव फलंदाजांमार्फत आली नाही. नाही तर, बकडन संघ शून्य धावांवर सर्व बाद झाला असता.
The 2nd XI travelled away today to face Falcon, who made 260-6 from their 40 overs. Unfortunately, the 2nds fell just short, being bowled out for 2 and giving Falcon a narrow 258-run victory…👀🤦🏻♂️ Therapy will begin this week for those involved. @SkyCricket @bbctms
— Buckden Cricket Club (@buckden_cc) June 19, 2021
फाल्कन्स संघाच्या एका गोलंदाजाने ६ विकेट एकट्याने घेतले. या गोलंदाजाचे नाव होते अमनदीप सिंग. अमनदीपच्या व्यतिरिक्त हैदर अलीने २ विकेट बाद केले. क्रिकेटच्या विश्वात आजवर एवढी खराब फलंदाजी कोणत्याही संघाने केली नव्हती.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत-न्यूझीलंड सामना आणि पाऊस; गेल्या २ वर्षात आयसीसी सामन्यांमध्ये दिसले हेच चित्र
विक्रमादित्य सचिनला न जमलेला पराक्रम न्यूझीलंडच्या साऊदीने करून दाखवला