भारताचा दिग्गज वेगवान गेलंदाज जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) अलीकडेच रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) यांच्या कर्णधारपदातील फरक निदर्शनास आणून दिला आहे. त्यांची कर्णधारपदाची शैली एकमेकांपेक्षा कशी वेगळी आहे याचा बुमराहनं खुलासा केला आहे. यासोबतच त्यानं या तिघांनी एक सांघिक आणि वैयक्तिकरित्या आपला खेळ कसा सुधारला, यावरही सांगितलं आहे.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) तिन्ही कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली त्यानं आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली त्याच्या खेळात आणखी सुधारणा झाली. यानंतर तो रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली आता दमदार कामगिरी करत आहे.
इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राशी बोलताना बुमराह म्हणाला, “एक फलंदाज असूनही, रोहित अशा काही कर्णधारांपैकी एक आहे ज्यांना वेगवान गोलंदाजांबद्दल सहानुभूती आहे. रोहित जिद्दी नाही. तो फीडबॅकसाठी पूर्णपणे तयार आहे.” धोनीविषयी बोलताना बुमराह म्हणाला, “धोनीने मला खूप लवकर सुरक्षित केले. त्याला त्याच्या प्रवृत्तीवर प्रचंड विश्वास आहे. तो गरजेपेक्षा जास्त नियोजनावर अवलंबून नाही.” बुमराहच्या मते, हा विश्वास आणि सहज वृत्तीने त्याला आत्मविश्वास दिला जो आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी आवश्यक आहे.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीविषयी (Virat Kohli) बोलताना बुमराह म्हणाला की, “विराटमध्ये खूप उर्जा आणि उत्साह आहे. तो त्याच्या भावना उघडपणे व्यक्त करतो. विराट अजून कर्णधार नाही. पण तरीही तो संघाचा लीडर आहे. कर्णधारपद हे एक पद आहे पण संघ 11 लोक चालवतात. विराटमुळे भारतीय संघात उर्जा निर्माण झाली.” बुमराहनं भारतीय संघाच्या फिटनेसचे सर्व श्रेय कोहलीला दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी पॅट कमिन्सने घेतला मोठा ब्रेक, कारण जाणून व्हाल हैराण
पाकिस्तान सरकारनं हाॅकी दिग्गजांचा केला अपमान?
वनडेमध्ये 3 तर कसोटीत 2 वेळा ‘क्रिकेटर ऑफ द इयर’, विराटकडे चक्क इतक्या आयसीसी पुरस्कार