पलाकेले: येथे आज श्रीलंका विरुद्ध भारत एकदिवसीय मालिकेतला तिसरा सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत ५० षटकात ९ विकेट्स गमावून फक्त २१७ धावा केल्या. लाहिरू थिरिमनेने १०५ चेंडूत ८० धावा केल्या, श्रीलंकेच्या बाकी कुठल्या ही फलंदाजला भारतीय गोलंदाजांचा सामना करता आला नाही. भारतीय यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जसप्रीत बुमराने चमकदार कामगिरी करत ५ गाडी बाद केले.
भारताने चौथ्याच षटकात श्रीलंकेच्या यष्टीरक्षक सलामीवीर फलंदाज निरोशन डिकवेलाला तंबूत परत पाठवले. त्यानंतर ८व्य शतकात कुशल मेंडिस ही बाद झाला. हार्दिक पंड्याने त्याची विकेट घेतली. श्रीलंकेच्या डावाला स्तिरता देण्याचा प्रयत्न थिरिमने आणि चंडिमल यांनी केला. त्यांनी संघाची धावसंख्या १०० पर्यंत नेली पण त्यानंतर चंडिमल बाद झाला. त्यानंतर श्रीलंकेच्या कोणत्याही फलंदाजा खेळपट्टीवर जास्त काळ टिकता आले नाही.
भारताकडून २७ धावा देऊन बुमराने ५ विकेट्स घेतल्या तर हार्दिक, अक्षर आणि केदार यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. भारताला हा सामना जिंकण्यासाठी २१८ धावांचे लक्ष आहे.