चीनमध्ये पार पडलेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत महिला एकेरीमध्ये भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला सलग दुसऱ्यांदा रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.
तिसऱ्या मानंकित सिंधूला ४५ मिनेटे चाललेल्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मरिनने १९-२१,१०-२१ अशा फरकाने सरळ सेटमध्ये पराभूत केले.
या सामन्यात पहिल्या सेटमध्ये सिंधूने चांगली सुरुवात करताना ६-४ अशी आघाडी होती. ही आघाडी तिने मध्यंतरापर्यंत ११-८ अशी कायम ठेवली. परंतू मरिननेही तिला कडवी लढत देताना सिंधूची आघाडी कमी करत सेट १६-१६ असा बरोबरीत आणला.
यानंतरही यांदोघींमध्ये आघाडीसाठी चुरस पहायला मिळाली. मात्र अखेर ७ व्या मानांकित मरिनने हा सेट १९-२१ अशा फरकाने जिंकत सामन्यात आघाडी घेतली.
दुसऱ्या सेटमध्येही मरिनने तिचा आक्रमक खेळ कायम ठेवताना १-७ अशा गुणांच्या फरकाने आघाडी घेतली. मध्यंतरापर्यंत मरिनने ही आघाडी वाढवत २-११ अशी केली.
त्यांनतरही मरिनने सिंधूला वरचढ होण्याची कोणतीही संधी न देता हा सेट सहज १०-२१ अशा फरकाने जिंकत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
या सामन्याआधी मरिन आणि सिंधूमध्ये १२ सामने झाले असून यात दोघींनीही एकमेकींवर प्रत्येकी ६ विजय मिळवले आहेत. तसेच या दोघी २०१६ च्या आॅलिम्पिकच्या अंतिम सामन्यातही आमने-सामने आल्या होत्या. यातही मरिनने बाजी मारली होती.
तसेच जर सिंधूने अंतिम सामन्यात विजय मिळवला असता तर ती वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिलीच भारतीय बॅडमिंटनपटू ठरली असती.
याआधी वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सिंधूने ३ पदके मिळवली होती. यात तिने २०१३ आणि २०१४ ला कांस्यपदक तर २०१७ ला रौप्यपदक मिळवले आहे. त्यामुळे हे या स्पर्धेतील तिचे चौथे पदक तर सलग दुसरे रौप्यपदक ठरले आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–बापाने १९८३ ला तर मुलाने २०१८ला टीम इंडीयाला दिला त्रास
–तब्बल ७ वर्षांनी भारतीय फलंदाज कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी
–इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मिळणार ‘या’ तीन खेळाडूंना डच्चू?