ऑस्ट्रेलिया दौर्यावर असलेल्या भारतीय संघाचा बॉर्डर-गावसकर मालिकेतील तिसरा कसोटी सामना ७ जानेवारी पासून सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवण्यात येणार आहे. मात्र सध्या सिडनी शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्याचे ठिकाण संभ्रमात होते. मात्र नुकतेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याविषयी अधिकृत वक्तव्य केले आहे.
“जर सिडनी क्रिकेट स्टेडियम भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील तिसऱ्या कसोटी सामन्याचे आयोजन करू शकले नाही. तर हा सामना मेलबर्न क्रिकेट स्टेडियम येथे खेळवण्यात येईल. असे असले तरी, ‘बॉक्सिंग डे’ सामन्यादरम्यान याविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल. मात्र मालिकेतील शेवटच्या आणि चौथ्या कसोटी सामन्याचे ठिकाण कायम राहणार आहे. १५ जानेवारीपासून ब्रिसबेनच्या गाब्बा स्टेडियमवर हा सामना होणार आहे,” असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले.
JUST IN: The latest on the venue for the third #AUSvIND Test… https://t.co/lsh1uPYYAu
— cricket.com.au (@cricketcomau) December 24, 2020
“सिडनीत प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्नात”
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले यासंदर्भात बोलताना म्हणाले की, “जागतिक महामारीदरम्यान क्रिकेट सामन्यांचे आयोजन करणे आव्हानात्मक असते. परिस्थितीनुसार वेळापत्रकात काही बदल करावे लागू शकतात. सिडनीच्या उत्तरी किनाऱ्याकडील भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार होत आहे. त्यामुळे सिडनी शहरात जाणारी क्विन्सलँडची सीमा बंद करण्यात आली आहे. तरीही खेळाडूंना सिडनीत प्रवेश करण्याची परवानगी मिळावी, यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सदस्य क्विन्सलँड सरकारशी चर्चा करत आहेत.”
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! भारताविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीसाठी असा असणार ऑस्ट्रेलियाचा ११ जणांचा संघ
स्टीव्ह स्मिथने थोपटली भारतीय फिरकीपटू आर अश्विनची पाठ; म्हणाला…