पुणे | पीवायसी हिंदु जिमखाना क्लब यांच्या तर्फे पीवायसी करंडक 14वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत कॅडेन्स अकादमी संघाने क्रिकेट मास्टर्स अकादमी संघाचा तर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने पुना क्लब संघाचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी मैदानावर झालेल्या सामन्यात दिग्वीजय पाटीलच्या नाबाद 78 धावांच्या बळावर कॅडेन्स अकादमी संघाने क्रिकेट मास्टर्स अकादमी संघाचा 105 धावांनी मोठा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना कॅडेन्स अकादमी संघाने 45 षटकात 5 बाद 259 धावा केल्या. यात मोहित दहिभातेने 43, अनिरूध्द साबळेने 33 व वेदांत जगदाळेने 31 धावा करून दिग्वीजयला सुरेख साथ दिली. 259 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना साहिल अभंगच्या 94 धावा संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत व अरकम सय्यद व निलय सिंघवी यांच्या आक्रमक गोलंदाजीपुढे क्रिकेट मास्टर्स अकादमी संघ 45 षटकात 9 बाद 154 धावांत गारद झाला. अरकम सय्यदने 27 धावात 3 व निलय सिंघवीने 26 धावांत 2 गडी बाद केले तर प्रथमेश थिटे व दिग्वीजय पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. नाबाद 78 धावा व 1 गडी बाद करणारा दिग्वीजय पाटील सामनावीर ठरला.
पुना क्लब क्रिकेट मौदानावर झालेल्या सामन्यात भार्गव महाजनच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर व्हेरॉक वेंगसरकर क्रि
स्पर्धेचा सव्स्तर निकाल- साखळी फेरी
कॅडेन्स अकादमी- 45 षटकात 5 बाद 259 धावा(दिग्वीजय पाटील नाबाद 78, मोहित दहिभाते 43, अनिरूध्द साबळे 33, वेदांत जगदाळे 31, आर्यन पवार 1-15, साहिल अभंग 1-56, पार्थ बोत्रे 1-28, रचीत वोरा 1-43, रोनक पारेख 1-17) वि.वि क्रिकेट मास्टर्स अकादमी- 45 षटकात 9 बाद 154 धावा(साहिल अभंग 94, पार्थ बोत्रे 19, अरकम सय्यद 3-27, निलय सिंघवी 2-26, प्रथमेश थिटे 1-26, दिग्वीजय पाटील 1-16) सामनावीर – दिग्वीजय पाटील
कॅडेन्स अकादमी संघाने 105 धावांनी सामना जिंकला.
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी- 45 षटकात 8 बाद 248 धावा(शार्दुल विनोदे 65, भार्गव महाजन नाबाद 59, अर्चीसमन दास नाबाद 20, अभिजीत पवार 31, प्रसन्न पवार 18, अथर्व पंगारे 23, हर्षवर्धन पाटील 2-49, अभिषेक कुलकर्णी 2-27, ओम माळी 1-26, हृतिक उत्तेकर 1-39, अथर्व एकबोटे 1-58) वि.वि पुना क्लब- 45 षटकात 9 बाद 132 धावा(हर्षवर्धन टिंगारे नाबाद 38, श्रेयस गारमपल्ली नाबाद 24, ओम भाबड 5-14, ओंकार राजपुत 1-16, भर्गव महाजन 1-30,अर्चीसमन दास 1-19)सामनावीर- भार्गव महाजन
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने 116 धावांनी सामना जिंकला.