कोलंबो: चेतेश्वर पुजारा जसा क्रिकेटच्या मैदानात खेळतो त्याच प्रमाणेच वैयक्तिक आयुष्यातही तो शांत आणि संयमी आहे असे तुम्हाला वाटेल पण तसे काही नाही. त्याने काल मुलाखत देताना म्हटले आहे की जर स्लेजिंग केल्याचा फायदा भारतीय गोलंदाजांना होत असेल तर तो ही स्लेजिंग करण्यास तयार आहे.
“फुटबॉल खेळतानाही मी खूप आवाज करतो आणि आता तुम्ही बघत असालच की क्रिकेटच्या मैदानावरही माझी बडबड चालू असते. मी हळूहळू स्लेजिंग कशी करतात हे शिकत आहे आणि जर गोलंदाजांना त्याचा फायदा होणार असेल तर मी स्लेजिंग करणार.” असे पुजारा म्हणाला.
कोलंबोमधील श्रीलंका विरुद्ध भारत दुसरी कसोटी ही पुजाराची कसोटी कारकिर्दीतील ५०वी कसोटी होती आणि त्यात त्याने शतक लगावले होते. या कसोटी मालिकेत त्याचे हे दुसरे शतक आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत फलंदाजीच्या यादीत पुजारा तिसऱ्या क्रमांकावर आहे.