भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी सामन्याची मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करताना चौथ्या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयात भारतीय संघातील युवा आणि नवोदित खेळाडूंचे योगदान महत्वाचे योगदान होते. यामध्ये दुसर्या कसोटी सामन्यात आपले पदार्पण करणार्या शुबमन गिलने ही महत्वाची कामगिरी केली आहे.
बॉर्डर-गावसकर मालिकेचा शेवट झाल्याने भारतीय संघ मायदेशी परतला आहे. त्यामुळे सर्व भारतीय खेळाडू आपल्या आपल्या घरी गेले आहेत. त्यामुळे भारतीय संघाचा युवा सलामी फलंदाज सुद्धा घरी आहे. आता त्याने आपल्या कामगिरीबद्दल बोलताना सांगितले की, ऑस्ट्रेलिया दौर्यावर जाण्यापूर्वी त्याने भारतीय संघाचा माजी खेळाडू युवराज सिंग सोबत सराव केला होता. ज्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या शॉर्ट पीच चेंडूचा सामना करताना मदत झाली.
पंजाबच्या या दोन खेळाडूंनी आयपीएलचे तेरावे सत्र यूएईत होण्यापूर्वी एका सराव शिबिरात भाग घेतला होता. जे शिबीर 21 दिवसांचे होते. ज्यामध्ये युवराज सिंगने फलंदाजी करण्यासाठी शुबमन गिलची मदत केली होती. नुकतेच भारतीय संघाचा युवा सलामी फलंदाज शुबमन गिलने या गोष्टीचा खुलासा केला आहे.
शुबमन गिल टाइम्स ऑफ़ इंडिया सोबत बोलताना म्हणाला, “आयपीएलपूर्वी युवी पाजी सोबतचे सराव शिबीर खूप फायदेशीर ठरले. त्या शिबिरात मला, त्यांनी मला बाऊंसर खेळण्यासाठी तयार केले. ते मला प्रत्येक कोनातून शेकडो शॉर्ट पीच चेंडू फेकत होते आणि मला वाटते या गोष्टीचा फायदा झाला.”
शुबमन गिलने चारक सोटी सामन्यांच्या बॉर्डर गावसकर मालिकेतील तीन सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले. या तीन सामन्यातील 6 डावात 51.80 च्या सरासरीने त्याने 259 धावा केल्या. त्यामुळे बॉर्डर गावसकर मालिकेत सर्वाधिक धावा काढणारा सहावा फलंदाज ठरला. त्याने गाबा येथे खेळण्यात आलेल्या कसोटी सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याने 146 चेंडूचा सामना करताना 91 धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाने हा सामना 3 विकेट्सने जिंकला. मात्र त्याचे कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक 9 धावांनी हुकले. त्यामुळे त्याचे वडील लखविंदर गिल खूप नाराज झाले.
शुबमन गिल म्हणाला तो सुद्धा हे शतक पूर्ण होवू न शकल्याने नाराज झाला होता. तो म्हणाला, “शतक ठोकले असते, तर सोन्याहून पिवळे झाले असते. मी सेट होतो, त्यामुळे मला शतक पूर्ण करायला हवे होते. परंतु त्याचबरोबर मी खूश आहे की, संघाच्या विजयात योगदान देवू शकलो. ही मालिका मला शिकण्याची खूप चांगली संधी होती आणि मी एक चांगला क्रिकेटपटू बनलो.”
ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी दौर्यानंतर आता इंग्लंड विरुद्ध भारतात होणारी मालिका शुबमन गिलने पुढील लक्ष्य आहे. तो म्हणाला, “इंग्लंड विरुद्धची मालिका माझ्यासाठी महत्वाची असेल, कारण मी आता नवोदित खेळाडू नाही. जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि जोफ्रा आर्चर सारख्या गोलंदाजाचा सामना करणे खूपच आव्हानात्मक असेल, परंतु मी यासाठी तयार आहे.”
महत्वाच्या बातम्या:
अन् बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी क्रिकेट स्टेडियममध्ये साप सोडण्याचा केला होता प्लॅन
ऑस्ट्रेलिया भूमीवरील ऐतिहासिक विजयानंतर आनंद महिंद्रा खुश! युवा पदार्पणवीरांना देणार ही महागडी भेट
पासा पलट गया! एकवेळ शास्त्रींना ट्रोल करणारे चाहतेच मागतायत त्यांची क्षमा, जाणून घ्या कारण