---Advertisement---

“विराट कोहली जर आगामी टी-२० किंवा वनडे विश्वचषक जिंकला नाही, तर नेतृत्वबदल होणार हे नक्की!”

On: शनिवार, जानेवारी 23, 2021 4:40 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला मागील बऱ्याच महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात कर्णधार पदावरून टीका सहन करावी लागत आहे. मर्यादित षटकांचा उपकर्णधार रोहित शर्माने मागील काही वर्षापासून सातत्याने जिंकलेली आयपीएल स्पर्धा व कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियात मिळवलेला मालिका विजय यामुळे विराटवर दबाव वाढत आहे.

विशेषतः अजिंक्य रहाणेने कसोटी मालिका जिंकल्यापासून विराट ऐवजी अजिंक्यला कसोटी कर्णधार पद देण्यात यावे अशी जोरदार चर्चा सुरू आहे. याचदरम्यान इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसर याने एक आक्रमक वक्तव्य केले असून, त्यामुळे विराट कोहलीच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

मॉन्टी पानेसरने एक रोखठोक प्रतिक्रिया दिली असून , त्याच्या मते जर विराट कोहली वनडे विश्वचषक किंवा टी-20 विश्वचषक जिंकण्यात अयशस्वी ठरला तर त्याने आपल्या कर्णधार पदाचा राजीनामा द्यावा.  पानेसर म्हणाला, “हा वाद रंगतदार आहे. माझ्या मते रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांच्या कॉम्बिनेशनने उत्तम काम केले आहे. ज्यावेळी त्यां दोघांना संधी मिळाली त्यावेळी त्यांना त्याचा पुरेपूर फायदा उठवला आहे. त्यामुळे आता विराट कोहलीवर या दोन कर्णधारांना हाताळण्याची जबाबदारी असेल.”

पुढील टी-२० विश्वचषक तसेच वनडे विश्वचषक भारतातच होणार आहे. अशा वेळी यजमान देश म्हणून भारताकडून चाहत्यांच्या मोठ्या अपेक्षा असतील. त्यामुळे मायदेशात जर विराट हे विश्वचषक जिंकू शकला नाही, तर नक्कीच नेतृत्वबदलावर चर्चा केली जाईल.”

दरम्यान आगामी इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या मालिकेत विराटच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. प्रत्येक भारतीयाला अपेक्षा आहे की भारतीय संघ विशेष मेहनत न घेता इंग्लंडविरुद्ध मालिका विजय मिळवेल. मात्र जर यात विराटला अपयश आले तर कर्णधार पदावर चर्चा होण्यास आणखी एक मुद्दा निर्माण होईल.

महत्वाच्या बातम्या:

विराटला नेतृत्त्वपदावरुन हटवाल, तर टीम इंडियाची परंपरा धुळीस मिळेल, दिग्गजाचे मोठे भाष्य

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी युवीसोबत हा सराव केल्याने झाला फायदा, शुबमन गिलने केला खुलासा

तुला वडिलांच्या कबरीजवळ पाहून माझं मन, सिराजच्या कृतीने अभिनेता धर्मेंद्रच्या डोळ्यात आणलं पाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---