प्रो-कबड्डीत सलग दोन वेळेस अंतिम फेरीत प्रवेश आणि दोन्ही वेळेस विजेतेपद मिळवण्याचा करिष्मा फक्त पटणा पायरेट्स संघाने करून दाखवला आहे. यु मुंबानंतर सलग दोनवर्ष अंतिम फेरी गाठणारा पटणा हा एकमेव संघ आहे. जेथे यु मुंबा तीन वेळेस अंतिम फेरीत पोहचली पण फक्त एकच वेळेस विजेतेपद मिळवू शकली, पण पटणा मागील दोन्ही मोसम म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या मोसमात सलग अंतिम फेरीत प्रवेश केला आणि दोन्ही विजेतेपदे मिळवली.
मागील वेळेपेक्षा या वर्षी पटणा पायरेट्स संघाची स्थिती तितकी मजबूत नाही, संघाची सारी दारोमदार ही डुबकी किंग प्रदीप नरवालवर असणार आहे. त्याला रेडींगमध्ये मोनू गोयत साथ देईल. पायरेट्सकडे आता मागील मोसमासारखे मजबूत कॉर्नर नाहीत पण विशाल माने आणि सचिन शिंगाडे लेफ्ट आणि राइट कव्हर आहेत. संघात आता धर्मराज चेरलाथन सारखा अनुभवी डिफेंडर नाही ज्याने मागील मोसमात संघाच्या कर्णधाराची जबाबदारी पेलली होती.
पूर्ण विचार केला तर पटणाचा संघ आता फक्त आणि फक्त प्रदीप नरवाल याच्यावर अवलंबून असणार आहे.विशाल आणि सचिन संघाला कितपत डिफेन्समध्ये मजबुती देतात हे कुणास ठाऊक.
कसा असेल पाटणा पायरेट्सचा संभाव्य संघ –
१ प्रदीप नरवाल- रेडर
२ मोनू गोयत-रेडर
३ विशाल माने-राइट कव्हर
४ सचिन शिंगाडे- लेफ्ट कव्हर
५ संदीप -लेफ्ट कॉर्नर
६ विजेंदर सिंग- वाईट कॉर्नर
७ मोहंमद मघसोडुलु- ऑलराऊंडर