आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये २० संघ खेळले. आता या स्पर्धेचे सुपर-८चे सामने खेळले जाणार असून बाकी संघ स्पर्धेबाहेर झाले आहेत. यातील काही संघांनी एकही सामना जिंकला नाही. ते संघ बाहेर झाले असून आयसीसीने (आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना) त्यांना मोठी बक्षिस रक्कम दिली आहे.
या स्पर्धेत काही संघांची कामगिरी खूपच निराशाजनक झाली. तीन संघाना तर स्पर्धेचा एकही सामना जिंकता आला नाही. त्यांना साखळी फेरीतील चारही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या संघांनाही आयसीसीने कोटी रुपयांची रक्कम बक्षिस म्हणून दिली आहे.
टी२० विश्वचषकाच्या या दहाव्या आवृत्तीत ओमान, नामिबिया आणि कॅनडा संघाला एकही सामना जिंकता आला नाही. नामिबिया ग्रुप ए मध्ये होता, यामध्ये त्यांनी भारत, पाकिस्तान, नेदरलॅंड्स आणि यूएसएविरुद्ध सामने गमावले. ओमान ग्रुप बी मध्ये होता आणि त्यांनी झिम्बाब्वे, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंडविरुद्धचे सामने गमावले होते. कॅनडा ग्रुप डी मध्ये होता. त्यांना दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि यूएईविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.
या संघानी विश्वचषकात एकही सामना जिंकला नाही. आयसीसीने मागील टी२० विश्वचषकात ९ ते १२ स्थानावर असलेल्या प्रत्येक संघाला २४७,५०० अमेरिकन डॉलर (२ कोटी २५ लाख रुपये) दिले होते. तसेच १३ ते २० स्थानावर असलेल्या संघांना २२५,००० अमेरिकन डॉलर (जवळपास २ कोटी रुपये) दिले होते. यामुळे यंदाही २-२ कोटी रुपये मिळण्याची अधिक शक्यता आहे.
हे तिन्ही असोसिएट संघ आहेत, त्यांना आयसीसी स्पर्धांमध्ये खेळताना अधिक अनुभव मिळतो. त्यांच्यासाठी आयसीसीकडून मिळालेली ही बक्षिस रक्कम त्यांच्या क्रिकेटमधील विकासासाठी उपयोगी ठरते. तसेच ते पुढील स्पर्धेसाठी खेळाडूंना लागणाऱ्या नव्या क्रिकेट किटसाठी आणि मैदांनासाठी त्याचा वापर करून पुन्हा एकदा स्पर्धेत खेळतील नव्या जोमाने खेळतील.
बाकी असोसिएट संघांची कामगिरी पाहिली तर ईटलीचा हा पहिलाच टी२० विश्वचषक होता. त्यांनी मात्र त्यांचा एकमेव विजय मिळवला, तो सामना नेपाळविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला.






