जगप्रसिद्ध कॅनेडियन रॅपर ‘ड्रेक’ यानं भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात सट्टेबाजीतून 7 कोटींहून अधिक रुपये जिंकले आहेत. टी20 विश्वचषकात रविवारी झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ड्रेकनं या सामन्यात भारताच्या विजयावर सट्टा लावला होता. त्यानं सामन्यापूर्वी इंस्टाग्राम स्टोरी टाकून भारतावर 5.4 कोटी रुपयांचा सट्टा लावल्याचं सांगितलं होतं.
‘यूके मिरर’ नुसार, ड्रेकनं या सामन्यावर सट्टा लावून 7.58 कोटी रुपये जिंकले, ज्यापैकी 2.16 कोटी रुपये नफा आहे. ड्रेकनं क्रिकेट सामन्यावर सट्टा लावण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यानं आयपीएल 2024 च्या फायनलमध्ये शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्सवर सट्टा लावला होता. रिपोर्ट्सनुसार, ड्रेकनं या सामन्यातून सट्टेबाजीद्वारे 1.7 कोटी रुपये कमावले होते. हा त्याचा क्रिकेटमधील पहिलाच सट्टा होता.
ड्रेकला सट्टेबाजीमध्ये खूप रस आहे आणि त्यानं क्रिकेटपूर्वी इतर अनेक खेळांवर मोठा सट्टा लावला आहे. बेटिंगमध्ये खूप सक्रिय असलेल्या ड्रेकनं गेल्या काही महिन्यांत अनेक खेळांवर सट्टा लावला आहे. त्यानं ‘सुपर बाउल’मध्ये कॅन्सस सिटी चीफ्सवर 2.34 दशलक्ष डॉलर्सची पैज लावली आणि जिंकली होती. याव्यतिरिक्त, त्यानं UFC 300 मध्ये ॲलेक्स परेराच्या जमाहल हिलवर पैज लावून 1.2 दशलक्ष डॉलर्स जिंकले होते.
मात्र, बेटिंगमध्ये ड्रेकचे अनेकदा मोठं नुकसानही झालं आहे. हेवीवेट चॅम्पियनशिप बॉक्सिंग विजेतेपदाच्या सामन्यात ड्रेकनं टायसन फ्युरीवर सट्टा लावला होता. मात्र, या सामन्यात टायसन फ्युरीला अलेक्झांडर उसिककडून पराभव पत्करावा लागला. या सट्ट्यात ड्रेकला 5 लाख 65 हजार डॉलर्सचं नुकसान सहन करावं लागलं होतं.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करताना 19 षटकांत सर्व गडी गमावून 119 धावा केल्या. प्रत्युत्तरात, 120 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 113 धावाच करू शकला. अशाप्रकारे भारतानं 6 धावांनी विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाची सुपर 8 मध्ये धडक! ट्रॅव्हिस हेडचा आयपीएलमधील फॉर्म जारी, पॉवरप्लेमध्ये रचला इतिहास
“कृपया लक्ष द्या!” उमर अकमलची ही कसली पोस्ट? कमेंट्स वाचून तुम्ही पोट धरून हसाल
भारत विरुद्ध कतार सामन्यात मोठा राडा! खराब रेफरींगमुळे टीम इंडियाचं विश्वचषकात खेळण्याचं स्वप्न भंगलं