---Advertisement---

कोरोना व्हायरसमुळे आरसीबीसह आयपीएलला बसणार मोठा धक्का!!

On: बुधवार, मार्च 11, 2020 3:21 PM
---Advertisement---

जगभरात कोरोना व्हायरसचा वेगवान प्रसार झाल्याने त्याचा परिणाम भारतातही दिसू लागला आहे.  अनेक क्रीडा स्पर्धांवर कोरोनाव्हायरसची टांगती तलवार आहे. याचा मोठा परिणाम इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 13व्या हंगामावरही होऊ शकतो.

कर्नाटक सरकारने कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बेंगळुरूमध्ये आयपीएलमधील कोणतेही सामने आयोजित करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आयपीएलसाठी हा मोठा फटका मानला जात आहे. 

कर्नाटक सरकारने आयपीएलमधील कोणतेही सामने आयोजित करण्याचेही नाकारले आहे. विराट कोहली कर्णधार असलेल्या रॉयल चॅलेंजरर्स बेंगलोरचे घरचे सामने बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी मैदानावर होतात. 

नुकत्याच समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार कर्नाटक सरकारने केंद्रिय सरकारला पत्र लिहिले आहे. यामध्ये यंदाच्या आयपीएलला पुढे ढकलण्यास किंवा रद्द करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर या रिपोर्टमध्ये असेही सांगितले आहे की कर्नाटक सरकानने आयपीएलचे सामनेही आयोजित करण्यास नकार दिला आहे. 

पण असे असले तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी सोमवारी (9 मार्च) असे सांगितले होते की नुकत्याच झालेल्या कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे आयपीएलवर परिणाम होणार नाही.

“आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि सर्व खबरदारी घेत आहोत. आम्ही सर्व उपाय करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. सर्व काही आम्ही ध्यानात ठेऊन आहोत. अद्याप आयपीएलची वेळ आलेली नाही. घाबरू नका. आत्तापर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही,” असेही बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले होते.

यावर्षी 29 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

…म्हणून सेहवाग म्हणतो सचिन तेंडूलकरने थकवले!!!

हार्दिक पंड्या तब्बल ६ महिन्यांनंतर पुनरागमनासाठी सज्ज, पहा व्हिडिओ

चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूंनी अशी साजरी केली धुळवड, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---