अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मुंबई संघाने यावर्षीची रणजी ट्रॉफी नावावर केली. मुंबई संघासाठी रणझी ट्रॉफी इतिहासातील हे 42वे विजेतेपद होते. संपूर्ण हंगामात मुंबईच्या खेळाडूंचे प्रदर्शन चमकदार राहिले. पण कर्णधार अजिंक्य रहाणे याचे प्रदर्शन या रणजी हंगामात समाधानकारक नव्हते. भारतीय दिग्गजाच्या प्रदर्शनावर अनेकांनी प्रश्न देखील उपस्थित केले. याच पार्श्वभूमीवर विजेतेपद जिंकल्यानंतर अजिंक्य रहाणे याने खास प्रतिक्रिया देखील दिली.
अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मुंबई संघाने रणजी ट्रॉफी 2024 मध्ये ग्रुप स्टेजमधील 7 पैकी 5 सामने जिंकले. एका सामन्यात मुंबईला पराभव स्वीकारावा लागला, तर एक सामना अनिर्णीत राहिला. रहाणेने संपूर्ण हंगामात एकूण 8 सामने खेळले आणि 214 धावा केल्या. अंतिम सामन्यात मात्र रहाणेच्या बॅटमधून अर्धशतक निघाले. त्याने विदर्भविरुद्ध दुसऱ्या डावात 73 धावांची कमाल खेळी केली.
अंतिम सामन्यात मिळालेल्या विजयानंतर अजिंक्य रहाणे म्हणाला, ‘चढ उतार खेळाचा भाग आहेत. मी कधीच स्वतःचा विचार करत नाही. संघासाठी काय योग्य आहे, हेच नेहमी पाहत असतो. मी बॅटने यावर्षी संघासाठी सर्वात कमी धावा केल्या आहेत. पण आम्ही चॅम्पियन बनलो याचा आनंद आहे. प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात असा काळ येतो. तुम्हाला फक्त मेहनत घेत रहावे लागते.’
मुंबई रणजी संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज आणि अजिंक्य रहाणेचा जुना सहकारी धवल कुलकर्णी याने गुरुवारी आपला अखेरचा क्रिकेट सामना खेळला. कारकिर्दीतील अंतिम सामन्यात कुलकर्णीने चार विकेट्स घेतल्या आणि मुंबईला रणजी ट्रॉफी मिळवून दिली. त्याच्या निवृत्तीबाबत रहाणे म्हणाला, “मी 14 वर्षांखालील क्रिकेटपासून त्याच्यासोबत (धवल कुलकर्णी) खेळत आहे. आम्ही 19 वर्षांखालील संघासोबतचा दौरा एकत्र केला होता. मैदानात आणि मैदानाबाहेर तो ज्या पद्धतीने राहतो, त्यातून तो युवा खेळाडूंना अनुभव देत असतो. संघासाठी तो फायदेशीर राहिला आहे. तो एक आदर्श आहे. मी धवलाल त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा देऊ इच्छितो.”
दरम्यान, मुंबईने हा अंतिम सामना 169 धावांनी जिंकला. नाणेफेक गमावल्यानंतर मुंबईला प्रथम फलंदाजी करावी लागली. पहिल्या डावात त्यांनी 224, तर विदर्भने 105 धावा केल्या. पहिल्या डावात मुंबईने आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात देखील 418 धावा कुटल्या, विजयासाठी विदर्भला 538 धावांचे लक्ष्य मिळाले. पण विदर्भ संघ 368 धावांवर सर्वबाद झाला. (Captain Ajinkya Rahane’s reaction after helping Mumbai win the Ranji Trophy)
महत्वाच्या बातम्या –
IPL 2024 : ऋषभ पंतच्या डॉक्टरांचा खुलासा, म्हणाले अपघातानंतर ऋषभ पंतची आई…
मोठी बातमी! श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू लाहिरू थिरिमनेचा भीषण कार अपघात, अन्…