उद्या दिग्गज क्रिकेटपटू एमएस धोनी ३०० वनडे सामने खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या खास क्लबमध्ये सामील होणार आहे. सचिन तेंडुलकर(४६३), राहुल द्रविड (३४४), मोहम्मद अझरुद्दीन(३३४), सौरव गांगुली(३११) आणि युवराज सिंग(३०४) या खेळाडूंनी यापूर्वी ३०० सामने खेळले आहेत.
जेव्हा पाहुणा भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध ४था वनडे सामना खेळेल तेव्हा भारताचा हा माजी कॅप्टन कूल या अनोख्या विक्रमला गवसणी घालेल. ज्या धोनीच्या नावावर २०१९च्या विश्वचषकाला घेऊन संघातील स्थानाबद्दल अनेक चर्चा झाल्या तो धोनीच या मालिकेत भारताचा तारणहार म्हणून समोर आला. दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडे सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी पार पाडली.
अशा या दिग्गजांची अनेक क्रिकेट रेकॉर्ड आहेत परंतु एक जाणकार क्रिकेटप्रेमी म्हणून आपणाला ही नक्की माहित पाहिजे!
#१ २९९ वनडे सामन्यात धोनी भारताकडून २६६ तर ३ सामने आशिया संघाकडून खेळला आहे. त्यात त्याने एकूण ५१.९३च्या सरासरीने ९६०८ धावा केल्या आहेत.
#२ ३१ ऑक्टोबर २००५ला जयपूरला धोनीने वैयक्तिक सर्वोच्च धावा करताना लंकेविरुद्ध नाबाद १८३* धावा केल्या होत्या.
#३ धोनीने चितगावला २३ डिसेंबर २००४ साली बांगलादेश संघाविरुद्ध वनडे पदार्पण केले आणि त्या सामन्यात तो गोल्डन डक अर्थात पहिल्याच चेंडूवर धावबाद झाला.
#४ भारताकडून सार्वधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो सचिन(१८४२६), गांगुली(११२२१), द्रविड(१०७६८) यांच्यापाठोपाठ चौथ्या स्थानी आहे.
#५ धोनीने धावांचा पाठलाग करताना जिंकलेल्या सामन्यात तब्बल ४० नाबाद खेळी खेळल्या आहेत.
#६ धोनी तब्बल ७२वेळा नाबाद राहिला आहे. चामिंडा वास आणि शॉन पोलाक या दोन खेळाडूंनी केवळ अशी कामगिरी केली आहे.
#७ वनडेमध्ये सार्वधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत धोनी शाहिद आफ्रिदी(३५१), सनथ जयसूर्या(२७०) ख्रिस गेल(२३८) यांच्यापाठोपाठ २०९ षटकारासह चौथ्या स्थानी आहे.
#८ १००० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केलेल्या खेळाडूंमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करताना धोनीची सरासरी सार्वधिक अर्थात १०१.८४ आहे. अन्य कोणत्याही खेळाडूची ही १००च्या पुढे नाही.
#९ ६व्या क्रमांकावर फलंदाजी करताना धोनीने विक्रमी ३७३८ धावा केल्या आहेत.
#१० सर्वाधिक वेळा यष्टिचित करण्याचा विक्रम सध्या धोनी आणि संगकाराच्या नावावर असून दोघांनीही ९९ वेळा खेळाडूला यष्टिचित केले आहे.
#११ २५० किंवा त्यापेक्षा जास्त वनडे खेळलेल्या सर्व खेळाडूंमध्ये धोनीची सरासरी सार्वधिक आहे. त्याची २९९ सामन्यात सरासरी ५१.५५ आहे तर या यादीत दुसऱ्या स्थानावर सचिन असून त्याची सरासरी ४४.८३ आहे.
PC: http://www.espncricinfo.com