विश्व टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2025 (WTC Final 2025) मध्ये साउथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघ (SA vs AUS) समोरासमोर होते. साऊथ आफ्रिका संघाने 5 विकेट्सने सामना जिंकून इतिहास रचलेला आहे. 27 वर्षानंतर आफ्रिकेने ट्रॉफी त्यांच्या नावावर केली आहे, तसेच दुसरीकडे ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सलग दुसऱ्यांदा जिंकली नाही. पराभवानंतर कर्णधार पॅट कमिन्सने (pat Cummins) मोठ वक्तव्य केलं आहे.
पराभवानंतर पॅट कमिन्सने म्हटले, ही गोष्टी खूप लवकर बदलू शकते पण दुर्भाग्य आणि ही खूप लांबची गोष्ट होती. नेहमीच काही गोष्टी होतात, पहिल्या चांगली आघाडी आणि त्यांना बाद करण्याचा प्रयत्न असे झाले नाही. लियोनो खतरनाक दिसत होते पण त्याला विकेट भेटली नाही. एडेन शानदार पद्धतीने खेळला. दक्षिण आफ्रिका (South Africa) ट्रॉफी जिंकण्याचे हकदार होते त्यांनी स्वतःला खेळात बनवून ठेवले आणि संधीच सोनं केलं.
सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 56.4 षटकात 212 धावा केल्या होत्या. या डावात स्टीव स्मिथ आणि ब्यू वेबस्टरने 112 चेंडूत 66 धावा केल्या होत्या. धावांचा पाठलाग करताना आफ्रिका संघाने फक्त 138 धावा करू शकला. आफ्रिका आणि 57.1 षटकार पर्यंत फलंदाजी केली, या प्रकारे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 74 धावांनी आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरुवात अतिशय खराब पद्धतीने झाली. फक्त 73 धावांवर 7 विकेट्स पडल्या. त्यानंतर मिचेल स्टार्क (58 धावा) आणि एलेक्स कैरी (43 धावा) दोघांनी संघ सांभाळत 207 धावांपर्यंत पोहोचला.
धावांचा पाठलाग करताना साउथ आफ्रिका संघाची सुरुवात सुद्धा चांगली झाली नाही. ओपनर रियान रिकेल्टन फक्त 6 धावांवर बाद झाला, पण नंतर एडेन मार्करम संघासाठी टिकून राहिला आणि त्याने शानदार शतकी खेळी केली. त्याने तिसरा दिवस पूर्ण होण्याआधी 100 धावा पूर्ण केल्या. त्यासोबतच कर्णधार टेम्बा बावुमाने देखील चांगली खेळी केली, त्याने 66 धावा केल्या. मार्करमने 207 चेंडूत 136 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. आखिरकार साऊथ आफ्रिकाने 83.4 षटकात 282 धावा सामना जिंकला, टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2025 ट्रॉफी त्यांच्या नावावर केली.






