गुणतालिकेत तळाशी असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाने डेविड वॉर्नर याच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. 2 मे) टेबल टॉपर गुजरात टायटन्स संघाला नमवले. आयपीएल 2023च्या 44व्या सामन्यात दिल्लीने गुजरातला 5 धावांनी पराभूत केले. हा दिल्लीचा हंगामातील तिसरा विजय होता. हा सामना कमी धावसंख्येचा होता. मात्र, मोठमोठे आव्हान पार करणाऱ्या गुजरातचा या सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजांपुढे टिकाव लागला नाही. असे असले, तरीही वॉर्नर त्याच्या संघाच्या कामगिरीवर खुश दिसला नाही. त्याने सामना जिंकल्यानंतर धक्कादायक विधान केले.
काय म्हणाला वॉर्नर?
गुजरात टायटन्सविरुद्ध विजय मिळवल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा कर्णधार डेविड वॉर्नर (David Warner) संघाच्या प्रदर्शनावर खुश दिसला नाही. 2 चेंडूत 2 धावांवर धावबाद होणारा वॉर्नर सामन्यानंतर म्हणाला की, माहिती नाही, त्याच्या संघाच्या फलंदाजीला काय झालंय. तो म्हणाला, “आमच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. मात्र, आमच्या फलंदाजांनी संघर्ष केला आणि याचे श्रेय शमीच्या गोलंदाजीला जाते. ते आव्हान गाठण्यासाठी अमन आणि रिपलने ज्याप्रकारे फलंदाजी केली, ते शानदार आहे. धावबाद झाल्यावर मला राग येतो.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “मला माहिती नाहीये की, आमच्या फलंदाजीला काय होत आहे. आम्ही आज बॅटमधून सकारात्मक खेळण्याचा प्रयत्न केला. आम्हाला चेंडू स्विंग करायचा होता, सुरुवातीला विकेट्स घ्यायच्या होत्या. दुखापतीतून परतल्यानंतर खलीलने चांगले प्रदर्शन केले आणि ईशांत शर्मा नेहमीसाठी युवा झाला आहे. तेवतियाने जेव्हा शेवटी आक्रमण सुरू केले, तेव्हा मी जरा विचलित झालो, पण ईशांतने काम फत्ते केले.”
We continue to believe!
WHAT. A. WIN 💙 pic.twitter.com/fia4VZTt4F
— Delhi Capitals (@DelhiCapitals) May 2, 2023
वॉर्नरच्या नेतृत्वातील दिल्ली संघाने कमी आव्हानाचा या सामन्यात गुजरात टायटन्सला 5 धावांनी नमवले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या फलंदाजांनी 130 धावा केल्या होत्या. आव्हानाचा पाठलाग करण्यात पटाईत असलेल्या गुजरातला अखेरच्या षटकात 12 धावांचा पाठलाग करताना अपयश आले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये दिल्लीच्या 131 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातकडून कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने नाबाद 59 धावा केल्या. तसेच, अभिनव मनोहरने 26 धावांचे योगदान देत पाचव्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी रचली. तरीही संघाला 125 धावांवरच समाधान मानावे लागले. तेवतियाने 7 चेंडूत 3 षटकारांच्या मदतीने 20 धावा केल्या, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. (captain david warner clueless as delhi capitals batters stumble yet again in ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट-गंभीर भांडणात यूपी पोलिसांची एन्ट्री; म्हणाले, ‘आमच्यासाठी काहीच विराट किंवा गंभीर नाही, लगेच…’
पंड्याने उचलली दिल्लीविरुद्धच्या पराभवाची जबाबदारी; शमीच्या गोलंदाजीवर म्हणाला, ‘मला दु:ख होतंय…’