---Advertisement---

ईशांतच्या लाजवाब गोलंदाजीने दिल्लीचे आव्हान जिवंत, हार्दिकच्या नाबाद अर्धशतकानंतरही गुजरात पराभूत

On: मंगळवार, मे 2, 2023 11:13 PM
Delhi Capitals
---Advertisement---

आयपीएल 2023चा 44वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. उभय संघांतील या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 130 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात टायनट्सने 20 षटकांमध्ये 6 बाद 125 धावा केल्या आणि 5 धावांनी पराभव स्वीकारला. फिनिशर राहुल तेवतिया शेवटच्या षटकात झेलबाद झाल्याने गुजरातचा पराभव झाला.

दिल्ली कॅपिटल्स संघाने या सामन्याची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातसाठी वरच्या आणि मधल्या फळीतील सर्व फलंदाज मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरले. पावरप्लेच्या 6 षटकांमध्येच दिल्लीने पाच विकेट्स गमावल्या होत्या. मोहम्मद शमीने आपल्या कोट्यातील पहिल्या तीन षटकांमध्ये 7 धावा खर्च केल्या आणि सर्वाधिक चार विकेट्स नावावर केल्या. शमीने या सामन्यात एकूण 11 चेंडू खर्च करून 4 विकेट्स घेतल्या. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या 59 धावा करून नाबाद राहिला. मात्र, शेवटच्या चेंडूंवर तो नॉन स्ट्राईकवर असल्याने संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

गुजरातला शेवटच्या षटकात विजयासाठी 12 धावांची आवश्यकता होती. खेळपट्टीवर कर्णधार हार्दिक पंड्या आणि फिनिशर राहुल तेवतिया () होते. राहुल तेवतिया पुन्हा आपल्याकडे असलेली सर्वोत्तम फिनिशरची गुणवत्ता दाखवू शकला. शेवटच्या चार चेंडूवर हैदराबादला 9 धावा हव्या होत्या. दुसरीकडे ईशांत शर्मा आपल्या मोठ्या अनुभवासह दिल्लीला विजय मिळवून देण्याच्या प्रयत्नात होता. षटकातील चौथ्या चेंडूवर इशांतने तेवतियाला झेलबाद केले. शेवटच्या दोन चेंडूंवर गुजरातला विजयासाठी 9 धावांची आवश्यकात होती आणि स्ट्राईकवर राशिद खान होता. पाचव्या चेंडूवर गुजरातच्या फलंदाजांनी दोन धावा घेतल्या. षटकातील सेवटच्या चेंडूवर देखील राशिदला षटकार मारून सामना बरोबरीत आणता आला नाही. गुजरातने 5 धावांनी पराभव स्वीकारला.

उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीच विचार केला, तर दिल्लीसाठी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला अमन खान याने सर्वाधिक 51 धावा केल्या. या धावा त्याने 44 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकार मारून केल्या. गुजरातसाठी शमीव्यतिरिक्त राशिद खानने एक, तर मोहीत शर्माने 2 विकेट्स घेतल्या. या सामन्यानंतर चालू हंगामातील पर्पल कॅप शमीकडे आली, ज्याने आतापर्यंत 17 विकेट्स घेतल्या आहेत. गुजरातसाठी शेवटच्या षटकात राहुल तेवतियाने विकेट गमावली नसती, तर संघ जिंकू शकत होता. मात्र इशांतने आपला अनुभव कमी लावत त्याला तंबूत धाडले. नंतर नॉन स्ट्राईकवरील सेट झालेल्या हार्दिकला देखील शेवटच्या दोन चेंडूंवर संधी मिळाली नाही. दिल्लीसाठी गोलंदाजी विभागात खलील अहमद आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तसेच एन्रीच नॉर्किया आणि कुलदीप यादव यांनीही प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सेन्सेशनल शमी! दिल्लीची फलंदाजी उद्ध्वस्त करत बनवले विक्रमच विक्रम
‘माझं पेट्रोल संपलेलं…’, भेदक गोलंदाजीनंतर असं का म्हणाला शमी?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---