इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये नव्याने सामील झालेल्या गुजरात टायटन्स संघाने यंदाच्या हंगामातील पहिले ३ सामने सलग खिशात घातले होते. मात्र, सोमवारी (दि. ११ एप्रिल) खेळलेल्या गेलेल्या स्पर्धेतील २१व्या सामन्यात त्यांना सनरायझर्स हैदराबाद संघाने ८ विकेट्सने पराभूत केले आणि त्यांचा विजयीरथ रोखला. या विजयासाठी हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सनला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सामन्यादरम्यान सर्वाधिक चर्चेत राहिला तो गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या. पंड्याने आपला संघसहकारी मोहम्मद शमीवर आगपाखड केली. तसेच, शमीला शिवीगाळ केल्याचे नेटकरी म्हणत आहेत, आणि पंड्यावर संताप व्यक्त करत आहेत. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
झाले असे की, हैदराबाद संघाच्या (Sunrisers Hyderabad) डावाच्या १३व्या षटकादरम्यान हार्दिक पंड्या (Hardik Pandya) गोलंदाजी करत होता. यावेळी हैदराबादचा फलंदाज राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) मारलेला चेंडू मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) हातून निसटला. हा झेल सुटल्यानंतर पंड्या शमीवर भडकताना दिसला होता. या षटकात हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सनने पंड्याच्या गोलंदाजीवर सलग २ षटकारही ठोकले होते. त्यामुळे पंड्या खूपच नाराज झाला होता.
अशामध्ये याच षटकातील शेवटचा चेंडू त्रिपाठीने खेळला होता. त्या चेंडूवर राहुलने डीप थर्ड मॅनच्या दिशेने हवेत जोरदार फटका मारला होता. इथे शमी क्षेत्ररक्षण करत होता. चेंडू हवेत होता. मात्र, शमीने झेल घेण्याचा प्रयत्न केला नाही. खरं तर चेंडू शमीच्या थोडा अलीकडे टप्पा पडला होता.
https://twitter.com/rishobpuant/status/1513565695950262277?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1513565695950262277%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fipl-2022-srh-vs-gt-hardik-pandya-anger-erupts-over-mohammed-shami-97528
शमीने यावेळी चेंडू झेलण्याच्या ऐवजी अडवण्याचा प्रयत्न केला. हे पाहून पंड्या चांगलाच तापला आणि त्याने शमीवर आगपाखड केली. यादरम्यान पंड्याचा रागाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. दुसरीकडे, चाहते पंड्याच्या या वागणुकीमुळे त्याच्यावर संतापले आहेत. नेटकरी म्हणत आहेत की, शमीला शिवीगाळ करणे योग्य नव्हते. त्याच्याशी आदराने वागायला हवे होते. तरीही पंड्याच्या या रिऍक्शनवर शमीने लक्ष दिले नाही. मात्र, पंड्या त्याच्या या वागणुकीमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
Shami played for country not for money as like you…….
— Naveen Nirmal (@NaveenNirmal17) April 11, 2022
It is not right to use Hardik Pandya, it clearly shows that if someone gets something at the time, then he stays on the ground.
— 🇸 ℎ𝑎𝑑𝑎𝑏 🇦 𝑙𝑎𝑚 (@SHADABA36378702) April 12, 2022
सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर गुजरात संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ विकेट्सच्या नुकसानीवर १६२ धावा चोपल्या होत्या. यावेळी हैदराबाद संघाने २ विकेट्स गमावत १६८ धावा केल्या आणि सामना खिशात घातला. हैदराबादचा हा या हंगामातील दुसरा विजय होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
शतक झळकावल्यानंतर ऍलिस्टर कूकने गोलंदाजीतून वेधले सर्वांचे लक्ष; विचित्र रन- अपचा व्हिडिओ व्हायरल
व्याजासकट परतफेड! उमरानने १४०kph वेगाचा चेंडू मारला, चिडलेल्या हार्दिकनेही दिले भारी प्रत्युत्तर
वॉट अ कॅच! खतरनाक शुभमनला आऊट करण्यासाठी त्रिपाठीचा हवेत सूर मारत एकहाती झेल- Video