महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संंघ आमने-सामने होते. स्पर्धेत गुजरातचे नेतृत्व बेथ मूनी करतेय, तर मुंबईचे नेतृत्व हरमनप्रीत कौर हिच्याकडे आहे. बेथ मूनीने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय हरमनसेनेने प्राथमिकरीत्या चुकीचा ठरवला. या सामन्यात हरमनप्रीतने लौकिकाला साजेशी कामगिरी करत इतिहास रचला. ती डब्ल्यूपीएल 2023 स्पर्धेत अशी कामगिरी करणारी पहिली खेळाडू ठरली.
हरमनप्रीतने रचला इतिहास
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 207 धावा चोपल्या. या धावांमध्ये कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिचे सर्वाधिक योगदान होते. हरमनप्रीतने या सामन्यात फलंदाजीला उतरताच 3 धावांंनंतर फटकेबाजी करण्यास सुरुवात केली होती. यादरम्यान तिने एकूण 30 चेंडूंचा सामना करताना 14 चौकार ठोकत 65 धावा चोपत अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक झळकावत कर्णधार हमरनप्रीतने पुढे येऊन संघासाठी महत्त्वाची खेळी केली.
https://twitter.com/mipaltan/status/1632045602904379394
विशेष म्हणजे, हे अर्धशतक झळकावताच तिच्या नावावर इतिहास रचला गेला. ती महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील पहिले-वहिले अर्धशतक झळकावणारी खेळाडू बनली. हरमनप्रीतने या सामन्यात अवघ्या 22 चेंडूत 51 धावा करत अर्धशतक पूर्ण केले. या धावा करताना तिने 11 चौकारांचाही पाऊस पाडला. तिला 65 धावांवर स्नेह राणा हिने 17व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर दयालन हेमलता (Dayalan Hemalatha) हिच्या हातून झेलबाद केले.
https://twitter.com/wplt20/status/1632046802881986563
आयपीएलच्या पहिल्या हंगामात कुणी केलेली कामगिरी?
हे झालं डब्ल्यूपीएलच्या पहिल्या हंगामाचं. मात्र, आयपीएल 2008च्या पहिल्या-वहिल्या हंगामात अर्धशतक मारण्याची कामगिरी करण्याचा मान ब्रेंडन मॅक्युलम (Brendon McCullum) याला मिळाला होता. त्याने 32 चेंडूत 50 धावा करत आयपीएल स्पर्धेचे पहिले अर्धशतक रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध झळकावले होते. त्याने यादरम्यान 5 चौकार आणि 3 षटकारांचा पाऊस पाडला होता. विशेष म्हणजे, मॅक्युलम इथंच थांबला नव्हता. त्याने या संपूर्ण सामन्यात अवघ्या 73 चेंडूंचा सामना करत नाबाद 158 धावा चोपल्या होत्या. या धावा करताना त्याने चौकारांपेक्षा जास्त षटकार मारले होते. त्याने 10 चौकार आणि तब्बल 13 षटकारांची बरसात केली होती. (Captain Harmanpreet Kaur scored the first fifty of WPL)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WPLच्या पहिल्या सामन्यात मुंबईने गुजरातला चोप-चोप चोपलं, हरमनसेनेचे जायंट्सपुढं 208 धावांचं आव्हान
पहिली ओव्हर, पहिली विकेट, पहिली धाव अन् पहिला षटकार, वाचा WPLमधील खेळाडूंची पहिली-वहिली कामगिरी






