पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुलने गुरुवारी (७ ऑक्टोबर) खेळल्या गेलेल्या पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात एक नवीन विक्रम केला आहे. राहुल आयपीएलच्या इतिहासात पंजाब किंग्जसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळताना ४२ चेंडूत नाबाद ९८ धावांची महत्वाची खेळी केली होती. राहुलच्या या खेळीच्या जोरावर पंजाब किंग्जने अवघ्या १३ षटकांमध्ये सामन्यात विजय मिळवला.
केएल राहुल पंजाबसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने पंजाब किंग्जसाठी २०१८ पासून आतापर्यंत ५५ सामने खेळले आहेत आणि यामध्ये २५४८ धावा केल्या आहे. गुरुवारच्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यानंतर केलेल्या खेळीनंतर तो या यादीत पिहिल्या स्थानावर पोहोचला आहे. या सामन्यात त्याने अवघ्या २५ चेंडूंमध्ये त्याचे अर्धशतक पूर्ण केले होते आणि नाबाद राहून ९८ धावा केल्या. तसेच राहुलने यापूर्वी पंजाबसाठी सर्वाधिक १३२ धावांची खेळी केली होती. त्याने पंजाबसाठी आतापर्यंत दोन वेळा शतक आणि २३ वेळा अर्धशतके ठोकली आहेत.
राहुलच्या आधी पंजाबसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत शॉन मार्शचे नाव होते. त्याने संघासाठी २४७७ धावा केल्या होत्या. मार्शने पंजाबसाठी एक शतक आणि २० अर्धशतके केली आहेत. यादीत तिसऱ्या क्रमांकावर डेविड मिलर आहे. मिलरने संघासाठी १९७४ धावा केल्या आहेत. मिलर सध्या राजस्थान रॉयल्सचा खेळाडू आहे. सध्या आरसीबीमध्ये खेळणारा ग्लेन मॅक्सवेल या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्यान पंजाबसाठी १२४९ धावा केल्या आहेत. यादीत पाचवा क्रमांक क्रिस गेलचा आहे, ज्याने संघासाठी १३३९ धावा केल्या आहेत.
दरम्यान, गुरुवारच्या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्ज २० षटकांमध्ये ६ विकेट्सच्या नुकसानावर १३४ धावा करू शकला. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने अवघ्या १३ षटकांमध्ये ४ विकेट्सच्या नुकसानावर १३९ धावा केल्या आणि सामन्यात विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
आख्ख्या सीएसकेला एकटा राहुल पुरुन उरला, नाबाद ९८ धावा चोपत ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय बनला
आनंदी आनंद गडे! दीपक चाहरच्या साखरपुड्याचे चेन्नईकडून जोरदार सेलिब्रेशन; धोनी, रैनाचीही मस्ती
विजय केकेआरचा, पण ट्रोल होतेय मुंबई इंडियन्स, सोशल मीडियावर मीम्सचा सुळसुळाट