दरवर्षी ‘फोर्ब्स’ १०० सर्वाधिक कमावणाऱ्या खेळाडूंची सूची जाहीर करते. यावर्षीसुद्धा फोर्ब्सने १०० खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.
विशेष बाब अशी की, भारतीय कर्णधार विराट कोहली हा एकमेव क्रिकेटपटू आहे ज्याचे या यादीत नाव आहे.
विराट कोहलीचे ‘फोर्ब्स’च्या सूचितले स्थान
विराट कोहलीने सलग ५ व्या वर्षी ‘फोर्ब्स’च्या सूचित स्थान मिळवले आहे. या सूचित स्थान मिळवणारा हा एकमेव क्रिकेटपटू आहे. गेल्या वर्षी विराटने १९६ कोटींच्या (२६ मिलियन डॉलर) कमाईसह या सूचित ६६वे स्थान मिळवले होते. यावर्षी विराटने ७ स्थानांनी झेप घेतली आहे. त्याच्या यावर्षीच्या कमाईमध्ये ३२ कोटींची वाढ झाली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने १२ महिन्यांत जवळपास २२९ कोटींची कमाई केली आहे. तरीही यातून २५ कोटी (३.५ मिलियन डॉलर) हे त्याच्या वार्षिक पगारामधले आहेत. जवळपास २०४ करोड (२८ मिलियन डॉलर) हे त्याने विविध जाहीरातींमधून कमावले आहेत. २०१९ मध्ये विराट हा १८९ कोटींच्या कमाईसोबत या सूचित १०० व्या स्थानी होता.
मिक्स मार्शल आर्ट्स (एमएमए)चा दिग्गज खेळाडू कॉनर मैकग्रेगर जवळपास १५१७ करोड (२०८ मिलियन डॉलर) सोबत जगातील सर्वात जास्त कमावणाऱ्या खेळाडूंच्या सूचित प्रथमस्थानी आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सी हा ९१९ करोड (१२६ मिलियन डॉलर) सोबत या सूचित दुसऱ्या स्थानी आहे. तर क्रिस्टियानो रोनाल्डोने ८७५ करोडसह (१२० मिलियन डॉलर) स्थान ग्रहण केले आहे.
१०० खेळाडूंच्या सूचित फक्त २ महिला खेळाडू
या सूचित आतापर्यंत फक्त २ महिला खेळाडूंचा समावेश आहे. नाओमी ओसाका आणि सेरेना विल्यम्स या २ महिला खेळाडूंचे नाव या सूचित आहे. नाओमी ओसाका ४०२ कोटी (५५.२ मिलियन डॉलर्स) सोबत सर्वाधिक कमावणारी महिला खेळाडू आहे आणि पुरुष आणि महिलांमध्ये ती १५ व्या स्थानी आहे. सेरेना ही २५९ करोड ( ३५.५ मिलियन डॉलर्स) सोबत या सूचित ४४ व्या स्थानी आहे. या दोघी टेनिसपटू आहेत.
टेनिसमध्ये बोलायला गेले तर नोवाक जोकोविच २४३ करोड (३३.४ मिलियन डॉलर) सोबत ५२ व्या स्थानी आहे. राफेल नदाल हा १९३ कोटींसह (२६.५ मिलियन डॉलर्स) ९२ व्या स्थानी आहे. मागील वेळेस रॉजर फेडरर हा ६१२ करोड ( ८४ मिलियन डॉलर्स) सोबत या सूचित सातव्या स्थानी आला होता.
महत्वाच्या बातम्या
केकेआरला तगडा धक्का! ‘हा’ मॅचविनर खेळाडू खेळणार नाही आयपीएलचा उर्वरित हंगाम
ब्रॅडमन यांना १०० ची सरासरी ठेवण्यापासून रोखणारे एरिक हॉलिस, कारकिर्दीत मिळवले तब्बल २३२३ बळी
आयसीसीने घातलेली २ वर्षांची बंदी पूर्ण करुन सनथ जयसुर्या ‘या’ संघाचे प्रशिक्षकपद सांभाळण्यास सज्ज






