महिला प्रीमियर लीग स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरुने दिल्ली कॅपिटल्स संघावर सहज विजय मिळवला आहे. तसेच दिल्ली कॅपिटल्स संघाचा हा अंतिम सामन्यात सलग दुसरा पराभव आहे. तर या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लेनिंगला अश्रू अनावर झाले आहेत. कारण दिल्ली कॅपिटल्सचा संघ संलग दुसऱ्या हंगामात अंतिम सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे मेग लेनिंगला अश्रू अनावर झाल्याचे पहायला मिळाले आहे.
याबरोबरच दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने या हंगामात देखील दमदार फलंदाजी केली आहे. त्यामुळे मेग लॅनिंग या हंघामात धावाकरण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. तसेच तिला अंतिम सामन्यात ती काही खास करू शकली नाही. यामुळे मेग लॅनिंग मैदानावर भावूक झाल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये पहायला मिळालं आहे.
Meg Lanning got emotional & tears in her eyes after WPL Final lose at last night.
– Chin up, GOAT you played really well..!!! 👏🐐 pic.twitter.com/necEmnKxY4
— Tanuj Singh (@ImTanujSingh) March 18, 2024
सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मेग लॅनिंग रडताना दिसत आहे. यावरून चाहते देखील व्हिडिओ पाहताना भावूक झाले आहेत. यामुळे चाहते या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. तसेच अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विजयासाठी 114 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र ते आव्हान बंगळुरुने 19.3 षटकात 2 गडी गमवून 114 धावांचं आव्हान गाठलं आहे.
Meg Lanning 💔
Chin up, champ 🐐
📸 – JioCinema#WPLFinal #WPL2024 pic.twitter.com/FzvlbN2nVe
— shreya (@shreyab27) March 17, 2024
यानंतर दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने म्हंटलं आहे की, “विजेतेपद न मिळणंअर्थातच निराशाजनक आहे. फायनल ही या दिवशी चांगले खेळण्याबद्दल असते. आरसीबीचे अभिनंदन, तुम्ही आज रात्री पराभूत केलंत.”, तसेस पुढे बोलताना मेग लॅनिंग म्हणाली आहे की, “आम्ही या स्पर्धेत पाहिल्याप्रमाणे, विचित्र गोष्टी घडतात. संपूर्ण श्रेय आरसीबीला जातं. त्यांनी खरोखरच छान झुंज दिली आणि विजयासाठी पात्र होते. आम्ही खूप योग्य केले. दुर्दैवाने हवं तसं घडलं नाही. अनेक लोकांकडून खूप मेहनत घेतली गेली. सपोर्ट स्टाफचे आभार मानू इच्छितो. क्रिकेट हा एक मजेदार खेळ आहे . तुम्ही कधी जिंकता, कधी हारता.”
महत्वाच्या बातम्या –
- WPLच्या फायनलमध्ये दुसऱ्यांदा दिल्ली कॅपिटल्सच्या स्वप्नांचा भंग, कर्णधार मेग लेनिंगने सांगतिलं सामना नेमका कुठे फिरला
- WPL 2024 : आरसीबीच्या विजयावर राजस्थान रॉयल्सची चुटकी, शेअर केलं भन्नाट मिम