बुधवारी (दि. 26 एप्रिल) आयपीएल 2023 स्पर्धेतील 36वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर पार पडलेला हा सामना कोलकाता संघाने 21 धावांनी जिंकला. हा हंगामातील तिसरा विजय होता. सलग चार सामन्यात पराभव पत्करल्यानंतर बेंगलोरवरील विजयामुळे कर्णधार नितीश राणा भलताच खुश झाला. हा कोलकाताचा बेंगलोरवरील दुसरा विजय होता. यापूर्वी आयपीएलच्या 9व्या सामन्यातही कोलकाताने 81 धावांनी विजय मिळवला होता. यावेळी त्याने विजयाचे गुपीतही सांगितले.
काय म्हणाला नितीश राणा?
नितीश राणा (Nitish Rana) मागील काही सामन्यांमध्ये नाणेफेकीवेळी एकप्रकारचे वक्तव्य करत होता. त्याने स्वत: हे मान्य करत म्हटले की, “मागील तीन-चार सामन्यात नाणेफेकीवेळी मी ही गोष्ट बोलत होतो की, जर आम्ही मिळून खेळलो, तर निकाल आमच्या बाजूने असेल. अशा विजयासाठी तुम्हाला ड्रेसिंग रूममध्ये अनेक हिरो हवे असतात.”
कोलकाताला 200 धावांपर्यंत पोहोचवण्यात राणाने 21 चेंडूत 48 धावांची वादळी खेळी केली होती. त्यात 3 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. त्याला संघाच्या पुनरागमनाची आशा होती. तो म्हणाला की, “आम्हाला माहिती होते की, आम्ही पुनरागमन करण्यात यशस्वी होऊ. आम्हाला धावफलकावर मोठी धावसंख्या उभारायची होती. हेदेखील आधीपासूनच माहिती होते की, या सामन्याच्या दुसऱ्या डावात दव हा घटक असणार नाही.”
Three overs to go!
The Nitish Rana-Venkatesh Iyer partnership has now reached 79 off just 42 deliveries 🔥🔥
Follow the match ▶️ https://t.co/o8MipjFd3t #TATAIPL | #RCBvKKR pic.twitter.com/loBJAR27xh
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2023
गुणतालिकेत खराब स्थितीत
नितीशने विजयाचे श्रेय चांगल्या गोलंदाजीला दिले. तो म्हणाला की, “असे नाहीये की, चेंडू खूपच वळत होता. आमची गोलंदाजी सुधारत आहे. मी जिथेही सुयशला चेंडू टाकण्यास सांगतो, तो तसे करून दाखवतो. तो नेहमी म्हणतो की, तो त्याचे काम करेल. आम्ही त्याला फक्त एवढेच सांगतो की, हे पाहू नको की, तुझ्यासमोर कोणता फलंदाज खेळत आहे, फक्त तुझ्या गोलंदाजीवर लक्ष दे.”
For his economical spell of 3/27, @chakaravarthy29 becomes the Player of the Match in the #RCBvKKR contest 👏🏻👏🏻
Scorecard ▶️ https://t.co/o8MipjFKT1 #TATAIPL | #RCBvKKR pic.twitter.com/VrAjqvDbSM
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2023
मात्र, या विजयानंतरही कोलकाता गुणतालिकेत चांगल्या स्थितीत नाहीये. कोलकाताने आतापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यांपैकी 3 सामन्यात विजय, तर उर्वरित 5 सामन्यात पराभवाचा धक्का सहन केला आहे. कोलकाताचा नेट रनरेट हा -0.027 इतका आहे. हा मुंबई इंडियन्स संघाच्या नेट रनरेटपेक्षा (-0.620) खूप चांगला आहे. सध्या कोलकाता गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे. (captain nitish rana revels how his team able to beat rcb in ipl 2023 for the 2nd time)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘टी20, वनडे किंवा कसोटी, विराटचा दर्जाच वेगळा…’, कोहलीबद्दल दिग्गजाचे मन जिंकणारे वक्तव्य
आरसीबीच्या पराभवानंतर आपल्याच खेळाडूंवर संतापला विराट, म्हणाला, “असं खेळला तर हरणारचं ना”