भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धची वनडे मालिका गमावली आहे. पहिल्या सामन्यात 1 विकेट्सने आणि दुसऱ्या सामन्यात भारताने 5 धावांनी पराभव पत्करला आहे. ही मालिका गमावण्यासोबतच भारताला आणखी एक मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्यासह तीन खेळाडू शेवटच्या तिसऱ्या वनडे सामन्यातून बाहेर पडले आहेत. ही माहिती स्वत: भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिली आहे.
झाले असे की, बांगलादेश विरुद्ध भारत (Bangladesh vs India) संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (दि. 07 डिसेंबर) ढाका येथे खेळला गेला. या सामन्यात एक नाही, तर तब्बल तीन खेळाडू दुखापतग्रस्त झाले. तसेच, भारताला पराभवाचाही सामना करावा लागला. या पराभवासह भारतीय संघाविरुद्ध बांगलादेशने मालिकेत 2-0ने आघाडी घेतली.
रोहितसह तीन खेळाडू परतणार मुंबईला
या मालिकेतील शेवटचा आणि तिसरा वनडे सामना 10 डिसेंबर रोजी चट्टोग्राम येथे खेळला जाणार आहे. यापूर्वीच भारतीय संघासाठी वाईट बातमी समोर आली आहे. दुसरा वनडे सामना गमावल्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड (Coach Rahul Dravid) यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “निश्चितच कुलदीप सेन (Kuldeep Yadav), दीपक चाहर (Deepak Chahar) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) पुढील सामन्यात खेळू शकणार नाहीत. कुलदीप आणि दीपक मालिकेतून बाहेर पडले आहेत. रोहितही पुढील सामना खेळू शकणार नाही.”
🗣️ 🗣️ Head Coach Rahul Dravid takes us through the injury status of captain Rohit Sharma, Deepak Chahar & Kuldeep Sen #TeamIndia | #BANvIND pic.twitter.com/r6CEj5gHgv
— BCCI (@BCCI) December 8, 2022
पुढे बोलताना द्रविड म्हणाले की, “ते पुन्हा मुंबईला येईल, जिथे तज्ज्ञ त्यांची चौकशी करतील. यानंतर समजेल की, ते कसोटी मालिकेसाठी उपलब्ध राहतील की नाही. मात्र, हे नक्की आहे की, तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना ते खेळू शकणार नाहीत.”
Gets hit
Comes back for the team
Walks in at No.9 in a run-chase
Scores 51*(28) to get us close to the target
Take a bow captain! 🙌 🙌#TeamIndia | #BANvIND | @ImRo45 pic.twitter.com/v47ykcbMce
— BCCI (@BCCI) December 7, 2022
रोहितच्या डाव्या हाताच्या अंगठ्यातून निघाले होते रक्त
खरं तर, रोहितला ही दुखापत बांगलादेशच्या डावादरम्यान दुसऱ्या षटकात झाली होती. हे षटक वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याने फेकले होते. रोहित दुसऱ्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत होता. तसेच, षटकातील चौथ्या चेंडूवर अनामुल हकचा झेल आला, जो पकडण्यात रोहित अपयशी ठरला. यादरम्यान चेंडू लागल्यामुळे रोहितच्या डाव्या हाताच्या अंगठ्यातून रक्त निघू लागले होते.
दुखापतीवर बीसीसीआयने ट्वीट करत सांगितले होते की, बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्या दुखापतीवर उपचार करत आहे. त्याला तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. तसेच, दीपक चाहर याला हॅमस्ट्रिंगची दुखापत आहे. दुसऱ्या वनडेत त्याने फक्त 3 षटके गोलंदाजी केली होती, तर कुलदीप सेनला पाठीचा त्रास आहे.
अशात भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात या तीन खेळाडूंशिवाय कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (captain rohit sharma deepak chahar kuldeep sen ruled out of india vs bangladesh third odi)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहितने जीवाची बाजी लावून संघासाठी काढल्या धावा; पण गावसकरांच्या अपेक्षा खूपच जास्त; म्हणाले…
‘या’ ओव्हरमुळे भारताने दुसरा वनडे सामना गमावला, सिराजने एक- दोन नाही, तर सहाच्या सहा…