सोमवारी (21 ऑगस्ट) आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करेल. कर्णधार रोहित व निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी संघ निवडीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भारतीय संघाबाबत असलेल्या सर्व प्रश्नांची पत्रकारांना उत्तरे दिली. भारतीय संघातील पार्ट टाइम गोलंदाजांविषयी विचारल्यानंतर रोहितने स्वतःचे नाव पुढे केले.
आशिया चषक संघ निवडीनंतर पत्रकार परिषदेत रोहितला भारतीय संघातील पार्ट टाइम फिरकीपटूंविषयी विचारण्यात आले. त्यावेळी बोलताना रोहित म्हणाला,
“2011 विश्वचषकावेळी संघात असे अनेक खेळाडू होते जे गोलंदाजी व फलंदाजी करत. आम्ही देखील तसे क्रिकेटपटू पाहत आहोत. मात्र, एका रात्रीत असे खेळाडू तयार होत नाहीत. कदाचित तुम्ही रोहित शर्मा व विराट कोहली यांना विश्वचषकात काही षटके गोलंदाजी करताना पाहाल.”
भारताने जिंकलेल्या 2011 वनडे विश्वचषकात युवराज सिंग, सुरेश रैना, युसुफ पठाण, सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग हे पार्टटाईम गोलंदाजी करत. सध्या भारतीय संघात रवींद्र जडेजा व अक्षर पटेल हे अष्टपैलू तर कुलदीप यादव हा प्रमुख फिरकीपटू आहे. रोहित व विराट यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीस अनेक वेळा गोलंदाजी केली आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून ते केवळ फलंदाज म्हणून संघाचा भाग असतात.
आशिया चषकासाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
राखीव खेळाडू – संजू सॅमसन
(Captain Rohit Sharma Hints He And Virat Kohli Will Bowl In ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या –
आफ्रिदीचा टी10 मध्ये राडा! वयाच्या 43 व्या वर्षी केल्या 300 च्या स्ट्राईक रेटने धावा
BIG BREAKING! आशिया चषकासाठी टीम इंडियाची घोषणा, प्रमुख फलंदाजांचे संघात पुनरागमन