जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांंमध्ये भारतीय संघाचा हुकमी एक्का रविचंद्रन अश्विन याच्या नावाचाही समावेश होतो. अश्विनने आपल्या फिरकीच्या जाळ्यात जगातील भल्याभल्या फलंदाजांना अडकवले आहे. अशात आगामी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने अश्विनबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्याने यावेळी फिरकीपटूचे कौतुक केले आहे. तो म्हणाला की, अश्विनने मागील वर्षीपासून कोणताही वनडे सामना खेळला नव्हता, तरीही त्याच्याकडे जो अनुभव आणि दर्जा आहे, त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही.
रोहितची प्रतिक्रिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मा याने माध्यमांशी बोलताना आर अश्विन याच्याविषयी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “अश्विनकडे तो दर्जा आहे. त्याच्याकडे क्रिकेट खेळणे आणि दबाव सांभाळण्याचा अनुभव आहे. त्याने जरी मागील वर्षी वनडे क्रिकेट खेळले नव्हते, पण तुम्ही त्याच्या अनुभव आणि दर्जाकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. मागील काही वर्षात आपण पाहिले आहे की, त्याने किती चांगली गोलंदाजी केली आहे. त्याच्याकडे अनेक प्रकारची भिन्नता आहे.”
पुढे बोलताना रोहित म्हणाला, “त्याला विश्वचषक संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. आम्हाला अनेक गोष्टी पाहाव्या लागतील. ज्याप्रकारे सध्या गोष्टी सुरू आहेत, हे आमच्यासाठी योग्य आहेत. कारण, आमचे सर्व पर्याय तयार आहेत. आम्ही त्यांना पुरेसा खेळाचा वेळ दिला आहे. खेळाडूंना पुरेसे खेळण्याचीही संधीही मिळाली आहे.”
अश्विन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत संघाचा भाग
ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याला भारतीय संघात सामील केले गेले आहे. दीर्घ काळानंतर त्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. अश्विनने अखेरचा वनडे सामना जानेवारी, 2022मध्ये खेळला होता. त्यानंतर आता कुठे तो वनडेत परतला आहे. अश्विनच्या वनडे संघातील पुनरागमनानंतर असे म्हटले जात आहे की, त्याला विश्वचषक संघातही सामील केले जाऊ शकते. कर्णधार रोहित शर्मा यानेही संकेत दिले आहेत. (captain rohit sharma reacts on ravichandran ashwin s performances ahead of world cup 2023)
हेही वाचा-
जगातील बलाढ्य संघांना न जमलेला विक्रम नेपाळने केला, टी20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय
भीमपराक्रम! युवराजचा वेगवान अर्धशतकाचा रेकॉर्ड 16 वर्षांनी उद्ध्वस्त, नेपाळच्या पठ्ठ्याने केली डेरिंग; वाचाच






