आशिया चषक 2023 सुपर- 4 फेरीचा अखेरचा सामना भारत विरुद्ध बांगलादेश संघात शुक्रवारी (दि. 15 सप्टेंबर) खेळला गेला. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात बांगलादेशने भारताचा 6 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारतीय संघ एक-दोन आणि तीन नव्हे, तर चक्क 5 बदलांसह उतरला होता. या पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने हेच 5 बदल का केले? याविषयी भाष्य केले.
भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध 5 बदल का केले होते, याचे कारण सांगताना रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला, महत्त्वाचे पैलू पाहता काही खेळाडूंना संधी द्यायची होती. मात्र, या सामन्याचा निकाल महत्त्वाचा ठरत नाही. त्यामुळे रोहितने 5 बदल केले. रोहितच्या नेतृत्वात बांगलादेशविरुद्ध भारताचा हा वनडेतील सलग तिसरा पराभव आहे.
काय म्हणाला रोहित?
रोहित म्हणाला, तो खेळाडूंना विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेपूर्वी खेळासाठी वेळ देऊ इच्छित होता. तो म्हणाला, “आम्ही विश्वचषक पाहता इतर खेळाडूंनाही सामन्याचा वेळ देऊ इच्छित होतो. आम्हाला या सामन्यात जसे खेळायचे होते, तसे झाले नाही. आम्हाला काही असे खेळाडू आणायचे होते, जे विश्वचषकात खेळू शकतील. अक्षरने चांगली फलंदाजी केली. मात्र, तो सामना संपवू शकला नाही, पण श्रेय बांगलादेशच्या गोलंदाजांना जाते.”
शुबमन गिलचे कौतुक
भारतीय कर्णधार रोहित शर्माने शुबमन गिल (Shubman Gill) याचे जोरदार कौतुक केले. त्याच्या मते, गिलसाठी कोणताही पर्यायी सराव नसतो. तो प्रत्येक सरावात भाग घेतो. रोहित म्हणाला, “गिलचे शतक शानदार होते. तो आपल्या खेळावर विश्वास ठेवतो. त्याला माहिती आहे की, त्याला कसे खेळायचे आहे. तो संघासाठी काय करू इच्छितो, याविषयी बिल्कुल स्पष्ट आहे. मागील एक वर्षातील त्याचा फॉर्म पाहा. नवीन चेंडूविरुद्ध खूपच मजबूत आहे. वास्तवात खूप मेहनत घेतो गिल. गिलसाठी कोणताही पर्यायी सराव नसतो.”
सामन्याविषयी थोडक्यात
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 8 विकेट्स गमावत 265 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. भारताचे पहिले चार विकेट्स 100 धावांच्या आत पडल्या. रोहित शर्मा (0), पदार्पणवीर तिलक वर्मा (5), केएल राहुल (19) आणि ईशान किशन (5) यांना आपली विकेट गमवावी लागली. शुबमनने भारताकडून सर्वाधिक 121 धावांची शतकी खेळी, तर अक्षर पटेलने 42 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. मात्र, त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. भारत 49.5 षटकात 259 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे हा सामना बांगलादेशने 6 विकेट्सने जिंकला.
आता भारतीय संघाला रविवारी (दि. 17 सप्टेंबर) श्रीलंकेविरुद्ध आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. या सामन्याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. (captain rohit sharma statement after defeat india vs bangladesh asia cup 2023)
हेही वाचा-
आशिया चषक इतिहासातील टॉप 5 गोलंदाज! श्रीलंकनचा दबदबा, तर यादीत एकच भारतीय
गिलचं शतक व्यर्थ! बांगलादेशच्या ‘वाघां’चा बलाढ्य भारताविरुद्ध ऐतिहासिक विजय