वेस्ट इंडीजविरुद्धचा पहिला कसोटी सामना भारताला 12 जुलै पासून खेळायचा आहे. भारत आणि वेस्ट इंडीज (West Indies Vs India 1st Test) यांच्यातील पहिला कसोटी सामना 12 जुलैपासून डॉमनिकामध्ये खेळला जाईल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या नव्या सायकलमध्ये भारतीय संघ पुन्हा एकदा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात उतरेल. तर, यावेळी संघाचे उपकर्णधारपद बऱ्याच कालावधीनंतर अजिंक्य रहाणे याच्याकडे आले आहे. अशात पहिल्या कसोटी आधी या दोन्ही मित्रांमध्ये एक चांगला बॉण्ड पाहायला मिळाला.
बार्बाडोस येथे आठवडाभर सराव केल्यानंतर भारतीय संघ आता सामना ज्या ठिकाणी होणार आहे त्या डॉमिनिका येथे पोहोचला. पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील खेळाडू उच्चस्तरीय सराव करताना दिसले. मात्र, तेव्हाच कर्णधार रोहित शर्माचा मजेदार अंदाज देखील पाहायला मिळाला. काही भारतीय पत्रकार यावेळी सराव सत्रात भारतीय खेळाडूंच्या मुलाखत घेण्यासाठी पोहोचले होते.
𝘿𝙊 𝙉𝙊𝙏 𝙈𝙄𝙎𝙎!
When #TeamIndia Captain @ImRo45 turned reporter in Vice-Captain @ajinkyarahane88's press conference 😎
What do you make of the questions 🤔 #WIvIND pic.twitter.com/VCEbrLfxrq
— BCCI (@BCCI) July 11, 2023
हे पत्रकार अजिंक्यची मुलाखत घेत असताना रोहित शर्मा तेथे आला. त्यावेळी रोहितने पत्रकाराची भूमिका सांभाळत अजिंक्यला अनेक प्रश्न विचारले.
‘तू या ठिकाणी अनेक वर्षांपासून येत आहे, तर तू युवा खेळाडूंना काय संदेश देशील?’ असा प्रश्न त्याने अजिंक्यला केला. त्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाल्याने रोहितने सर्वांना आतमध्ये जाण्याची सूचना केली. सुरुवातीला पत्रकार अजिंक्यला प्रश्न विचारत असताना त्याने अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात या सर्व मुलाखतीचा आनंद घेतला. बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे
डॉमिनिका येथे होणारा हा पहिला कसोटी सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार 12 जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता सुरू होईल. भारतीय संघ या सामन्यात विजय मिळवून नव्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सायकलची विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल.
(Captain Rohit Sharma Turned As Reporter For Giving Ajinkya Rahane Interview)
महत्वाच्या बातम्या-
नाईट रायडर्सचे नेतृत्व नरीनच्या हाती! अमेरिकेत उडणार टी20 क्रिकेटचा धुरळा, ‘हे’ दिग्गज ही साथीला
पाकिस्तानला नडणार अतिशहाणपणा! ‘या’ संघाला वर्ल्डकपमध्ये प्रवेश देण्याची आयसीसीची तयारी