भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात 16 धावांनी विजय मिळवला. भारतीय फलंदाजांनी या सामन्यात धुवादार खेळी केली आणि संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिली. प्रत्युत्तरात आफ्रिकी संघाने देखील कडवे आव्हान दिले, पण त्यांना विजय मिळवता आला नाही. भारताच्या विजयानत सूर्यकुमार यादव याचे योगदान महत्वाचे ठरले. संघातील सर्वजण सूर्यकुमारचे महत्व जाणून आहेत. विजय मिळवल्यानंतर माध्यमांशी बोलताना कर्णधार रोहितने सूर्याचे तोंड भरून कौतुक केले.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या सामन्यात अवघे 22 चेंडू खेळला आणि यामध्ये 61 धावांची वादळी खेळी त्याने केली. यादरम्यान सूर्याचा स्ट्राईक रेट 277.27 होता आणि त्याच्या बॅटमधून पाच चौकार आणि पाच षटकार निघाले. सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा माध्यमांशी बोलत होता. त्यावेळी त्याने जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) संघात नसल्यामुळे त्याची कमी जाणवत असल्याचे सांगितले. रोहित म्हणाला, “उघड आहे जसप्रीत बुमराहची दुखापत संघासाठी चिंतेची बाब आहे. आम्हाला शेवटच्या षटकांमधील गोलंदाजीवर लक्ष द्यावे लागेल. ही अशी जागा आहे, जिथे आम्हाला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आम्ही फलंदाजी करताना काही अतिरिक्त धावा घेण्याच्या प्रयत्नात असतो.”
How can @surya_14kumar's dazzling form be retained? 🤔
🗣️ 🗣️ Here's what #TeamIndia captain @ImRo45 said. #INDvSA pic.twitter.com/Gkbaej2dHc
— BCCI (@BCCI) October 2, 2022
ज्यावेळी रोहितला सूर्यकुमार यादविषयी प्रश्न विचारला गेला, तर त्याने यावर हसत हसत उत्तर दिले. रोहित म्हणाला, “त्याचा फॉर्म पाहता आम्ही असा विचार करत आहोत की, त्याला थेट 23 ऑक्टोबर (टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध) रोजी मैदानात उतरवले पाहिजे.” रोहित पुढे असेही म्हणाला की, फक्त तो खुश राहिला पाहिजे. तो खुश तर आम्हीही खुश राहू. दरम्यान, आगामी टी-20 विश्वचषक 16 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. भारताला विश्वचषकातील अभियानाची सुरूवात 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध करायची आहे.
आफ्रिकी संघाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने प्रथम फलंदाजी करताना 3 विकेट्सच्या नुकसानावर 237 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकी संघाने देखील 3 विरेट्सच्या नुकसानावर 221 धावांपर्यंत मजल मारली. भारतासाठी सूर्यकुमावरव्यतिरिक्त सलामीसाठी आलेल्या केएल राहुलने 57, कर्णधार रोहितने 43, तर विराट कोहलीने नाबाद 49 धावांची खेळी केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
इंग्लंडने ठेचल्या पाकच्या नांग्या! दणदणीत विजयासह केला टी20 मालिकेवर कब्जा
प्रथम देश, मग मी! विराटच्या एका कृतीने कार्तिक फॅन्ससह देशाला केलं भावनिक