भारतीय पुरूष क्रिकेटचा एक संघ ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषकाची तयारी करत आहे, तर दुसरा संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. या दोन्हीनंतर भारत कुठे, कधी आणि कोणासोबत खेळणार हे निश्चित झाले आहे. भारताचे टी20 विश्वचषकानंतरचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारत प्रत्येकी तीन-तीन सामन्यांची वनडे मालिका आणि टी20 मालिका खेळणार आहे.
ऑस्ट्रेलियातील टी20 विश्वचषक (T20 World Cup) झाल्यावर भारत थेट न्यूझीलंडला रवाना होणार आहे. तेथे पहिला टी20 सामना 18 नोव्हेंबरला खेळला जाईल. यावेळी 13 दिवसांमध्ये एकूण सहा सामने खेळणार आहे, ज्यामध्ये तीन टी20 आणि तीन वनडे सामने समाविष्ट आहेत. ऑस्ट्रेलियातील टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना 13 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. त्यानंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिका लगेचच सुरू होणार आहे.
टी20 मालिकेतील पहिला सामना 18 नोव्हेंबरला वेलिंग्टन येथे खेळला जाणार आहे, तर दुसरा सामना 20 नोव्हेंबरला माउंट मॉन्गनुई येथे खेळला जाणार आहे. तसेच तिसरा सामना 22 नोव्हेंबरला नेपियर येथे खेळणार आहे. वनडे मालिकेची सुरूवात 25 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. हा सामना ऑकलंड येथे खेळला जाणार आहे. दुसरा सामना 27 नोव्हेंबरला हॅमिल्टन आणि तिसरा सामना 30 नोव्हेंबरला ख्राईस्टचर्च येथे खेळणार आहेत.
भारताला न्यूझीलंडने नेहमीच आव्हान दिले आहे. भारताने न्यूझीलंडमध्ये 2018-19मध्ये वनडे मालिका जिंकली आहे. त्यानंतर 2019-20मध्ये न्यूझीलंडच विजेता ठरला होता. 2019च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडच वरचढ ठरला होता. टी20 विश्वचषक 2021 झाल्यानंतर न्यूझीलंड संघ भारताच्या दौऱ्यात आला होता. तेव्हा भारताला टी20 मालिका 3-0 अशी गमवावी लागली. तसेच कसोटीमध्ये पाहिले तर 2021मध्ये झालेल्या कसोटी चॅम्पियनच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडच भारताला नडला होता. यामुळे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात नेहमीच न्यूझीलंड भारताचा अडसर ठरला आहे.
टी20 विश्वचषकात रोहित शर्मा भारताचे नेतृत्व करत असल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेत शिखर धवन कर्णधारपद भुषवत आहे. यामुळे न्यूझीलंड दौऱ्यात रोहितच कर्णधारपदाची धुरा सांभाळेल याची शक्यता आहे.
The dates and venues have been confirmed for the team's two upcoming tours to Pakistan to face @TheRealPCB in all three formats. Schedule | https://t.co/BgfyTQKy87 #PAKvNZ pic.twitter.com/rcnLd8CUmj
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 11, 2022
भारताचे न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक 2022
पहिला टी20 सामना -18 नोव्हेंबर, वेलिंग्टन
दुसरा टी20 सामना – 20 नोव्हेंबर, माउंट
तिसरा टी20 सामना – 22 नोव्हेंबर, नेपियर
पहिला वनडे सामना – 25 नोव्हेंबर, ऑकलंड
दुसरा वनडे सामना – 27 नोव्हेंबर, हॅमिल्टन
तिसरा वनडे सामना – 30 नोव्हेंबर, ख्राईस्टचर्च
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तब्बल 92 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर घडली ‘ती’ गोष्ट! 120 वर्षापूर्वी आफ्रिकेने केलेली सुरुवात
खुद्द वडिलांचाच नव्हता धोनीवर विश्वास! म्हणालेले, ‘तू यशस्वी होणार नाही’