पाकिस्तान आणि बांगलादेश (PAK vs BAN) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना रावलपिंडीत खेळवला जात आहे. पाकिस्ताननं पहिला डाव 448 धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात बांगलादेशनं पहिल्या डावात 565 धावा केल्या. दरम्यान या सामन्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बाबर आझमवर कर्णधार शान मसूद नाराज झाल्याचा दावा केला जात आहे. कारण बाबरनं सामन्यादरम्यान एक झेल सोडला. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
वास्तविक, एक्स वर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये शान मसूद (Shan Masood) रागावलेला दिसत आहे. तो ड्रेसिंग रूममध्ये सपोर्ट स्टाफला काहीतरी बोलतोय. मसूद रागानं मैदानाकडे बोट दाखवताना दिसला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “बाबर आझमनं (Babar Azam) झेल सोडल्यामुळे मसूद संतापला होता.” यासोबतच बाबरची खराब कामगिरीही त्याच्या रागाचं कारण ठरली.
Big fight between pct players,
Pakistani captain Shan masood angry on Babar azam drop catch and his performance😭😭😭 pic.twitter.com/BVhTtfzSW6
— AB de villiers (parody) (@virashtra18) August 24, 2024
रावलपिंडी कसोटीच्या पहिल्या डावात पाकिस्ताननं 6 गडी गमावून 448 धावा केल्या आणि डाव घोषित केला होता. बाबर आझम (Babar Azam) पहिल्या डावात शून्यावर बाद झाला. मोहम्मद रिझवाननं नाबाद 171 धावा केल्या. 239 चेंडूंचा सामना करत त्यानं 11 चौकार आणि 3 षटकार लगावले. सौद शकीलनं 141 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशनं पहिल्या डावात सर्वबाद 565 धावा केल्या. बांगलादेशकडून मुशफिकुर रहमाननं सर्वाधिक 191 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ 5 भारतीय खेळाडूंनी बांगलादेशविरुद्ध झळकावली सर्वाधिक शतकं!
सूर्यकुमार यादवला आयपीएलच्या या मोठ्या संघाकडून कर्णधारपदाची ऑफर! मुंबई इंडियन्सची साथ सोडणार का?
“रिकाम्या हातानं आलो, रिकाम्या हातानं जाणार”, निवृत्तीनंतर शिखर धवनची पहिली प्रतिक्रिया