---Advertisement---

अरे.. ही कोणती पद्धत ! आयपीएल फायनलमध्ये कर्णधार श्रेयस अय्यरनं आगळ्या वेगळ्या पद्धतीने केली नाणेफेक

On: रविवार, मे 26, 2024 9:26 PM
---Advertisement---

आयपीएल 2024 चा फायनल सामना सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या दोन संघामध्ये खेळला जात आहे.  तत्पूर्वी हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स आणि कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर टाॅससाठी मैदानात आले होते. त्यावेळी श्रेयस अय्यरनं अनोख्या पद्धतीनं टाॅस उडवला आणि सर्वांना हैराण केलं.

केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरनं टाॅस उडवताना स्वत:भोवती फिरकी घेत टाॅस उडवला. यानं सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन झालं. परंतु श्रेयसला टाॅसचं यश मिळालं नाही. हैदराबादचा विदेशी कर्णधार पॅट कमिन्सनं टाॅस जिंकला. आणि फलंदाजीचा निर्णय स्विकारला.

परंतु, पॅट कमिन्सचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्याच्यावरचं उलटला. हैदराबादला याचा फार मोठा फटका बसला. हैदराबादचा संघ धावांसाठी धडपडला आणि अवघ्या 113 धावांवरती बाद झाला.

दोन्ही संघांची प्लेइंग 11 

सनरायझर्स हैदराबाद – ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन

इम्पॅक्ट प्लेअर्स – उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, मयंक मार्कंडे, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर

कोलकाता नाईट रायडर्स – रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

इम्पॅक्ट प्लेअर्स – अनुकुल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत, शेरफाईन रदरफोर्ड

महत्वाच्या बातम्या-

कोलकाताच्या भेदक माऱ्यापुढे हैदराबादचा संघ ढेपाळला, ट्रॉफी जिंकण्यासाठी केकेआरपुढे अवघ्या 114 धावांचं आव्हान

मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू! आयपीएल फायनलमध्ये मिचेल स्टार्कचा कहर, हैदराबादचे फलंदाज थयथय नाचले

डेक्कन चार्जर्स हैदराबाद आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात काही संबंध, की दोन्ही वेगवेगळे? A ते Z इतिहास जाणून घ्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---