इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा चौथा सामना सोमवारी (२८ मार्च) लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात पार पडला. या सामन्यादरम्यान आयपीएल २०२२मध्ये नव्याने सामील झालेल्या लखनऊ संघाचा कर्णधार केएल राहुल शून्यावर बाद झाला. विशेष म्हणजे, त्याने शेवटपर्यंत न विसरणारा नकोसा विक्रम स्वत:च्या नावावर केला.
या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरात संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना लखनऊ संघाकडून कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आणि क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) सलामीला उतरले होते. मात्र, या सामन्याच्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर राहुल झेलबाद झाला. यावेळी गुजरात संघाकडून हे षटक वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) टाकत होता.
Our #SeasonOfFirsts began with THIS! 🤯
KL Rahul c. Wade b. Shami 0(1)#GTvLSG #AavaDe #TATAIPL pic.twitter.com/ZVOhpS4wmc
— Gujarat Titans (@gujarat_titans) March 28, 2022
शमीने टाकलेला चेंडू राहुलच्या बॅटची कड घेऊन थेट यष्टीरक्षक मॅथ्यू वेडच्या हातात गेला. त्यामुळे राहुलला तंबूचा रस्ता धरावा लागला. या विकेटसह राहुलने आपल्या नावावर नकोसा विक्रमही केला. आयपीएल इतिहासात डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद होणारा दुसरा कर्णधार ठरला. त्याच्या आधी आयपीएल २००९मध्ये १९व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलम (Brendon McCullum) अशाच पद्धतीने पहिल्या चेंडूवर बाद झाला होता. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा वेगवान गोलंदाज केविन पीटरसनच्या पहिल्याच चेंडूवर तंबूत परतला होता.
केएल राहुलच्या (KL Rahul) आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत ९५ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ८६ डावात फलंदाजी करताना ४६.७६च्या सरासरीने ३२७३ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने २ शतके आणि २७ अर्धशतकेही ठोकली आहेत.
आयपीएलमध्ये सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद होणारे कर्णधार
ब्रेंडन मॅक्यूलम- केविन पीटरसन (विरुद्ध, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, २००९)
केएल राहुल- मोहम्मद शमी (विरुद्ध, गुजरात टायटन्स, २०२२)*
महत्त्वाच्या बातम्या-
व्हॉट अ स्टार्ट! शमीने सर्वांच्याच उंचावल्या भुवया, पहिल्याच चेंडूवर लखनऊचा कर्णधार ‘गोल्डन डक’
महान फिरकीपटूने इशान किशनला म्हटले ‘अद्भुत’ खेळाडू, जुना किस्सा सांगत उधळली स्तुतीसुमने
ग्लेन मॅक्सवेलचे लागले भारतीय पद्धतीने लग्न, वरमाळा घालतानाचा Video तुफान व्हायरल